Policeman Suspended In Pune | पत्नीचा छळ करणार्या पोलीस हवालदारासह लाचखोर पोलीस हवालदार निलंबित; कोम्बिंगची ड्युटीच्या नावाखाली महिलेबरोबर पबमध्ये मारत होता मजा
पुणे : Policeman Suspended In Pune | कोम्बिंग ऑपरेशन ड्युटी असल्याच्या बाता मारुन प्रत्यक्षात पबमध्ये महिलेबरोबर मजा मारत असल्याचे पत्नीने पकडल्यानंतर पत्नीचा छळ करणार्या पोलीस हवालदारासह लाचखोरी करणार्या पोलीस हवालदार अशा दोघांना निलंबित करण्यात आले आहे.
पोलीस हवालदार हनुमंत गुलाब कांबळे Hanumant Gulab Kamble (रा. पीर वस्ती, वडकी) आणि गणेश शहाजी कस्पटे (Ganesh Shahaji Kaspate) अशी निलंबित केलेल्यांची नावे आहेत.
हनुमंत कांबळे हा काळेपडळ पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता तर, गणेश कस्पटे हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता.
हनुमंत कांबळे याच्या विरुद्ध त्याच्या पत्नीने कौटुंबिक छळाची फिर्याद काळे पडळ पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हनुमंत कांबळे याचा २ जानेवारी २००३ मध्ये विवाह झाला असून त्यांना १२ व ९ वर्षांची दोन मुले आहेत. त्याने पत्नीला दुकान टाकून दिले असून तो सुरुवातीला पत्नी व मुलांची काळजी घेत होता. दीड वर्षापासून त्याचे घरी येणे अनियमित झाले. कामावरुन येण्यास उशिर झाल्याबाबत पत्नीने विचारल्यावर मला तपास लागला आहे, मला मयत लागले आहे. मी ससून मध्ये आहे, अश कारणे सांगत असत. तो बेडरुमला कडी लावून फोनवर बोलत असत. कोणाशीतरी चॅटिंग करत होता. त्याबाबत शंका आल्याने पत्नीने मोबाईल चेक केल्यावर एका महिलेशी तो सतत चॅटिंग करत असल्याचे दिसून आले. त्याबाबत विचारणा केल्यावर ती महिला पतीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास आली होती.
त्यावेळी तिला मदत केली होती. त्यामुळे आमची ओळख झाली आहे. आमचेत काही नाही, असे सांगतिले होते. त्यावर पत्नीने विश्वास ठेवला. १५ जून २०२६ रोजी पत्नीने हनुमंत कांबळे याला रात्री फोन केल्यावर त्याने कोम्बींगची ड्युटी असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात तो पिंपरी चिंचवड येथील सी डॉक या पबमध्ये त्या महिलेसोबत दारु पित बसला होता. पत्नीने तेथे जाऊन जाब विचारल्यावर मी पोलीस आहे. माझे काही होणार नाही, तु काही करु शकत नाही, असे बोलला. त्यानंतर त्याने मी पुन्हा असे वागणार नाही, मी सुधारलो आहे, असे सांगितल्याने त्या पुन्हा सासरी गेल्या होत्या.
एके दिवशी त्यांना रामटेकडी इंडस्ट्रीयल भागात हनुमंत कांबळे याची कार दिसली. त्यांनी गाडीमध्ये कोण आहे, हे पाहिले तर कांबळे हा त्या बाईबरोबर होता. त्याने या महिलला उंड्री येथील ओम अपार्टमेंटमध्ये तो त्या महिलेबरोबर येथे रहात असल्याचे सासु व दीराला पकडून दिले. एवढे होऊनही त्याने या महिलेला उंड्री येथील न्यातीजवळील एका अपार्टमेंटमध्ये घर घेऊन दिले. त्यानंतर एके दिवशी त्यांनी त्या दोघांना बेडरुममध्ये एकत्रित नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर काही दिवसांनी ते पत्नीच्या माहेरी आले व माफी मागू लागले.
मुलांच्या भविष्याचा विचार करुन त्या सासरी आल्या. तरी त्याच्या वागणूकीत फरक पडला नाही. पत्नीचे गहाण ठेवलेले सोने सोडवुन घेऊन त्याने या महिलेला दुचाकी घेऊन दिली. ५ मे २०२६ रोजी रात्रपाळी ड्युटी करुन हनुमंत कांबळे हा घरी न आल्याने त्या ही महिला राहत असलेल्या घरी गेली. तिने दार वाजविल्यावरही दार उघडले गेले नाही. तेव्हा घरमालकाने येथून गॅलरीतून एक पोलीस उडी मारुन गेला असल्याचे सांगितले. तेव्हा तिने जाब विचारल्यावर “तू तिथे कशाला तमाशा करायला गेली आहे. मी तुला मारीन, मला तुझ्यासोबत रहायचे नाही, मी तुला घटस्फोट देईन,” अशी धमकी दिली. त्यानंतर पत्नीने काळे पडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन डॉ. सागर कवडे यांनी हनुमंत कांबळे याला निलंबित केले आहे. चेक बाऊंन्सच्या केसमध्ये नॉनबेलेबल वॉरंट न बजावण्यासाठी ५ लाखांची खंडणी उकळल्यानंतरही अडीच लाखांची मागणी करुन दीड लाख रुपये घेताना पोलीस हवालदार गणेश कस्पटे याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले होते. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली गेली. न्यायालयाने त्याला १० मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे़ गणेश कस्पटे याला पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर यांनी निलंबित केले आहे.
