PSI Nilesh Patil Suicide | पुण्यात  पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या

PSI Nilesh Patil Suicide | Police Sub-Inspector commits suicide by shooting himself in Pune

पुणे : PSI Nilesh Patil Suicide | औंध रोडवरील राहत्या घरी पोलीस उपनिरीक्षकाने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

निलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा़ नागरस रोड, औंध) असे या श्रेणी पोलीस उपनिरीक्षकांचे नाव आहे. ते पुणे पोलीस दलात पोलीस अंमलदार म्हणून भरती झाले होते. अनेक वर्षे सेवा केल्यानंतर त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती मिळाली होती. सध्या त्यांची विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. उच्च न्यायालयातील कामासाठी ते आज मुंबईला जाणार होते. परंतु, ते आज गेले नाहीत. नागरस रोड येथील राहत्या घरी ते होते. घरात त्यांचा मुलगा होता. गोळीचा आवाज ऐकून मुलगा बाहेर आला तेव्हा सोफ्यावर निलेश पाटील हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले त्यांनी पाहिले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता.

निलेश पाटील यांना आरोग्याच्या काही समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते एक ते दोन महिने सुट्टीवर होते. गणपती बंदोबस्तासाठी ते कामावर रुजू झाले होते. त्यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आले नाही. चतु:श्रृंगी पोलीस तपास करीत आहेत.

You may have missed