Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

Pune Crime Court News

पुणे : Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तरुणाचा जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायालयाने फेटाळला. गुन्ह्याचे गांभीर्य, पीडितेचे वय तसेच आरोपीला जामीन मंजूर झाल्यास पुराव्यांशी छेडछाड किंवा पीडितेला धमकावण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला.

सुशील ऊर्फ समाधान गंगाधर सूर्यवंशी Sushil, alias Samadhan Gangadhar Suryavanshi (वय 24) असे आरोपीचे नाव आहे. एप्रिल 2026 मध्ये एका अल्पवयीन मुलीच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिचा जबाब नोंदवला.

अभियोग पक्षाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने पीडित मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यातून बळजबरीने पळवून नेले आणि तिला कोल्हापूर जिल्ह्यात घेऊन जाऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आणि प्रकरणातील कागदपत्रांची पाहणी केल्यानंतर विशेष न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला.

आरोपीला जामीन मंजूर केल्यास पुराव्यांशी छेडछाड होण्याची तसेच पीडितेला धमकावले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

You may have missed