Pune ACB Trap Case | पुणे : प्रमोशनवर बदली झाली असताना 28 लाखांची लाच खासगी व्यक्तीमार्फत घेणारी महिला पोलीस अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

Pune ACB Trap Case | Pune: Female police officer caught in anti-corruption trap for accepting bribe of Rs 28 lakhs through private person while transferred on promotion

पुणे : Pune ACB Trap Case | पोलीस निरीक्षक म्हणून मुंबई लोहमार्ग येथे बढतीवर बदली झाल्याने त्यांना पुणे शहर पोलीस दलातून शुक्रवारी कार्यमुक्त करण्यात आले. नव्या पदावर रुजू होण्यापूर्वी महिला सहायक पोलीस निरीक्षकानी खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड जवळ २८ लाख घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले. या घटनेनंतर या महिला पोलीस अधिकार्‍याची पोलीस आयुक्तालयातील रुमचा सर्च घेतला जात आहे.

वैशाली तोटेवार (API Vaishali Totewar) असे या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांची पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती होती. त्यांच्याकडे ८ ते ९ तक्रार अर्ज तपासासाठी देण्यात आले होते. त्यांचा तपास सुरु असतानाच त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढतीवर मुंबई लोहगाव पोलीस येथे बदली करण्यात आली होती. त्यांना पुणे पोलीस दलातून कालच कार्यमुक्त करण्यात आले. परंतु, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची या अगोदरच कारवाई सुरु झाली होती. त्यांनी एका तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये २८ लाखांची लाच मागितली होती. त्यात एका खासगी व्यक्ती मार्फत बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉन्नाड येथे बोलवले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून २८ लाख रुपये घेण्यासाठी आलेल्या खासगी व्यक्तीला पकडले. पाठोपाठ वैशाली तोटेवार यांना ताब्यात घेतले. पाठापोठ दुसर्‍या दोन पथकांनी पोलीस आयुक्तालयातील त्यांच्या कार्यालयातील रुमची तर आणखी एका पथकाने त्यांच्या घराची झडती घेण्यास सुरुवात केली असून ही कारवाई अद्याप सुरु आहे.

You may have missed