Pune Crime News | एकाच ठिकाणी दुसर्‍यांदा फसवणुक करणार्‍यासाठी आला अन चालबाजी आली लक्षात, कॅश घेऊन ऑनलाईन पैसे पाठविण्याची बतावणी आली अंगाशी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  मला कॅशची गरज आहे, तुम्ही मला कॅश पैसे द्या, मी ऑनलाईन पैसे देतो, असे सांगून ट्रक चालकाला त्यांनी २५ हजार रुपयांना गंडा घातला होता. दुसर्‍या वेळी त्याने पुन्हा अशाच प्रकारे  फसवणुक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अगोदरची घटना चालकाला माहिती असल्याने त्यांनी खात्री करुन या चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले.

अमोल जिजाराम साबळे Amol Jijaram Sable (वय २६, रा. तुकारामनगर, आंबेगाव बुद्रुक) असे या आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार अतुल लोखंडे (वय २४) हा पळून गेला आहे.

याबाबत केवल राम (वय ३५, रा. पद्यावती प्रायव्हेट पार्किंग, पद्मावती) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना पद्मावती पार्किंगमध्ये २६ ऑक्टोंबर रोजी पावणे सात वाजता घडली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवल राम हे मुळचे राजस्थानचे असून ते पुण्यात २०२२ पासून पद्मावती येथे ट्रॅव्हल्स ऑपरेटरचे काम करतात. २६ ऑक्टोंबर रोजी दोघांनी पद्मावती पार्किंगमध्ये जितेंद्र, तेजाराम व पप्पू राम यांच्याकडे २५ हजार रुपये कॅश द्या. आम्ही तुम्हाला ऑनलाईन पैसे देतो, असे सांगितले.  त्यांची गरज लक्षात घेऊन या तिघांनी त्यांच्याकडील २५ हजार रुपये दिले. त्या दोघांनी त्यांचे मोबाईलमध्ये पैसे सेंड केले असल्याबाबत पेड झालेला फोटो दाखवला. तेव्हा जितेंद्र यांनी त्या दोघांना पैसे आले नाहीत, अशी विचारणा केली. तेव्हा पैसे येतील असे बोलून ते दोघे घाईघाईत नंबर प्लेट नसलेल्या दुचाकीवरुन पळून गेले. त्यांना ऑनलाईन पैसे मिळाले नाहीत. त्यांनी आपली फसवणूक झाल्याचे पार्किंगमधील सर्व कामगार, स्टाफ, वाहनचालक व इतर लोकांना सांगून हे चोरटे पुन्हा पार्किंगच्या  परिसरात दिसून आल्यास माहिती देऊन सर्तक राहण्यास केवल राम यांनी सांगितले.

१९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास केवल राम यांचा कामगार आकाश राजू थोरात याच्याकडे दोघे जण आले. त्यास बोलले की, मला ५ हजार रुपये कॅश द्या़ मी तुम्हाला ऑनलाईन पैसे पाठवतो. त्यावेळी आकाश याला जितेंद्र याच्याबरोबर घडलेली घटना आठवली. त्यांनी तत्काळ ही बाब केवल राम यांना सांगितली. त्यांनी स्टाफच्या मदतीने दोघांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्यातील एक जण पळून गेला. त्यानंतर त्यांनी तेजाराम यांना बोलावून तुमच्याकडून २६ ऑक्टोंबरला पैसे घेऊन गेलेला हाच का, असे विचारले. त्यांनी त्याला ओळखले. सध्या राजस्थान येथे गेलेल्या जितेंद्र यांना व्हिडिओ कॉल करुन शहानिशा केली असता त्यांनी अमोल साबळे याला ओळखले. तेव्हा त्यांनी ११२ वर कॉल करुन पोलिसांची मदत मागविली. सहकारनगर पोलिसांनी अमोल साबळे याला ताब्यात घेतले.

सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांनी सांगितले की, अगोदर या चोरट्यांनी २५ हजार रुपये घेऊन फेक अ‍ॅपवर पैसे सेंड केल्याचा मेसेज दिला. त्यांनी पैसे मिळाले आहेत का, हे चेक करेपर्यंत ते पळून गेले होते. आता पुन्हा असाच प्रकार करण्यास आले असताना त्यातील एकाला पकडण्यात आले आहे.

You may have missed