Pune Crime News | भररस्त्यात सामाजिक कार्य करणार्‍या महिलेला शिवीगाळ करुन तिच्याशी अश्लिल कृत्य करुन विनयभंग; कोंढवा पोलिसांकडून फैयाज युसुफ खान याच्यावर गुन्हा दाखल

Pune Crime News | A woman doing social work in a public place was abused and molested by performing obscene acts on her; Kondhwa police registers a case against Faiyaz Yusuf Khan

पुणे : Pune Crime News |  सामाजिक कार्य करणार्‍या महिलेला भररस्त्यात थांबवुन तिला अश्लिल शिवीगाळ करुन तिच्याबरोबर अश्लिल कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका महिलेने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी फैयाज युसुफ खान Faiyaz Yusuf Khan (रा. भीमपुरा, गल्ली नंबर १५, हजरत बाबाजान दर्गा, कॅम्प) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सामाजिक काम करतात. त्या घराजवळ कौसरबाग येथे १८ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता भाजी खरेदी करण्यासाठी जात होत्या. यावेळी वाटेत ओळखीच्या महिला भेटल्याने त्यांच्याशी बोलत थांबल्या होत्या. यावेळी फैयाज खान हा तेथे दुचाकीवरुन आला. त्यांच्याजवळ येऊन थांबला. त्यांना अश्लिल शिवीगाळ केली. क्या रे बहोत सोशल कीडा है क्या, यहा का भाई हू मै, तुझे दिखाता हू, असे बोलून धमकी देऊ लागला. त्यावर त्यांनी त्याला “काय झाले, मी काय केले आहे, तुला तेव्हा,” असे विचारले. त्यावर त्याने त्यांच्याकडे बघून अश्लिल इशारे करुन त्यांच्या अंगावरुन हात फिरवला. त्यांचा भर रस्त्यात विनयभंग केला. त्याच्या या कृत्याने या महिला खूप घाबरल्या. त्या तेथून निघून जाऊ लागल्या. तेव्हा त्यांना अश्लिल शिवीगाळ करत गाडीवरुन त्यांचा पाठलाग केला. पाठलाग करत त्यांच्या घरापर्यंत आला. या सर्व प्रकारामुळे या महिला खूप घाबरुन गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक स्नेहल जाधव तपास करीत आहेत.

You may have missed