Pune Crime News | प्रतिबंधित ई सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री करणार्‍या चालकाला विमानतळ पोलिसांनी केली अटक; दीड लाखांचा माल केला जप्त, शॉप मालकाचा शोध सुरु

Pune Crime News | Airport Police arrest operator selling banned e-cigarettes and hookah flavors; goods worth ₹1.5 lakh seized, search underway for shop owner.

पुणे : Pune Crime News | विमाननगरमधील निको गार्डन येथील स्मोक हेवन शॉपमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री करणार्‍या चालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. तेथून १ लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. या शॉपच्या मालकाचा शोध सुरु आहे.

मोहम्मद फाईज फारुख शेख Mohammad Faiz Farukh Shaikh (वय २२, रा. स्पर्श व्हिला, बालेवाडी, मुळ रा. संथडका, चारला, कुलुर पो. चारला, जि़. कासारगोड, केरला) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या शॉपचा मालक मोहम्मद शरीफ (रा. स्पर्श व्हिला, बालेवाडी, मुळ रा. मंगळुर, कर्नाटक) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अंमलदार राहुल किसन जोशी यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस अंमलदार लालु कहे यांना माहिती मिळाली की, विमाननगरमधील निको गार्डन येथील स्मोक हेवन शॉप येथे बेकायदेशीरपणे ई सिगारेट व हुक्का फ्लेवरची विक्री केली जात आहे. या माहितीवरुन पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व तपास पथकातील पोलीस अंमलदारांनी स्मोक हेवन शॉपवर ८ जून रोजी सायंकाळी छापा टाकला. त्या ठिकाणी असलेल्या मोहम्मद शेख याला ताब्यात घेतले. शॉपची झडती घेतली असता दुकानातील १ लाख ५७ हजार रुपयांचे प्रतिबंधित हुक्का फ्लेवर, ई सिगारेट व संंबंधित इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक नवनाथ क्षीरसागर तपास करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त प्रशांत अमृतकर, सहायक पोलीस आयुक्त नुतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु कहे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, दिगंबर गोरे, राजीव टोम्पे, प्रशांत सुतार, आशा धादवड, सना शेख यांनी केली आहे.

You may have missed