Pune Crime News | कॉस्मेटिक ज्वेलरी दुकानाच्या आड गांजा, हुक्का फ्लेवर, ई सिगारेटची विक्री; विमानतळ पोलिसांनी तरुणीला केली अटक, सव्वा दोन लाखांचा माल केला जप्त

Pune Crime News | Behind a cosmetic jewelry shop, sale of ganja, hookah flavors, and e-cigarettes; airport police arrested a young woman and seized goods worth one lakh twenty-five thousand

पुणे : Pune Crime News | फोनवरुन ऑर्डर घेऊन गांजा, हुक्का फ्लेवर, ई सिगारेट यांची विक्री केली जात असल्याच्या महितीवरुन विमानतळ पोलिसांनी एका कॉस्मेटिक ज्वेलरी शॉपवर छापा टाकून २ लाख १७ हजार रुपयांचा गांजा, हुक्का फ्लेवर, ई सिगारेट जप्त केल्या आहेत.  तेथे विक्री करणार्‍या तरुणीला अटक केली आहे.

अभिलाषा पंकज अहिरराव Abhilasha Pankaj Ahirrao (वय २२, रा. विमाननगर) असे या तरुणीचे नाव आहे. या तरुणीचे अगोदर डेक्कन जिमखाना येथे दुकान होते. गेल्या महिन्यात तिने हे दुकान बंद करुन विमाननगरमध्ये कॉस्मेटिक ज्वेलरी शॉप सुरु केले होते. या ठिकाणी असलेले आय टी कंपन्या, मोठ मोठी कॉलेजस व तरुण वर्ग यांना गृहीत धरुन तिने हे दुकान सुरु केले. या दुकानाच्या आड ती गांजा, हुक्का फ्लेवर, ई सिगारेट बेकायदेशीरपणे विक्री करत होती.

विमाननगरमधील लुंकड ड्रीम लॅन्ड येथील शॉपमध्ये बेकायदेशीर पणे ई सिगारेट व हुक्का फ्लेवरची क्लाऊड कार्टल या दुकानात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी या दुकानावर छापा टाकला. दुकानात अभिलाषा अहिरराव ही होती.  तिच्या दुकानाची झडती घेतली असता त्यात वेब सिगारेट, हुक्का फ्लेवर मिळून आले. तिच्या पर्सची तपासणी केली असता त्यात गांजाच्या पुड्या मिळाल्या. पिशवीसह गांजाचे वजन १३० ग्रॅम भरले. दुकानात फ्रिजच्या मागे एका कागदी बॉक्स व त्यात छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा आढळून आला. दुकानासमोर लावलेल्या दुचाकीची तपासणी केली़ त्यात हुक्का फ्लेवर व ई सिगारेट मिळून आल्या. पोलिसांनी २ लाख १७ हजार रुपयांचा गांजा, हुक्का फ्लेवर, ई सिगारेट जप्त केल्या आहेत. तिच्याविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात एन डी पी एस अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई अबिनाश कुमार, सहायक पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक महेश बोलके, प्रल्हाद गिते यांच्या सुचनांप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, हर्षल घागरे, पोलीस अंमलदार हरीप्रसाद पुंडे, लालु कºहे, रुपेश पिसाळ, अभय नागटिळक, राहुल जोशी, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, प्रशांत सुतार, सागर कासार, प्रणिता थोरात, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, राजीव टोम्पे यांनी केली आहे.

You may have missed