Pune Crime News | फ्लॅटसाठी 150 लोकांकडून 50 कोटी रुपये घेऊन बांधकाम न करता फसवणूक करणार्‍या रविनंदा लँडमार्कसच्या समीर जैनवर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | केसनंद येथे गृह प्रकल्प जाहीर करुन तब्बल १५० जणांना बुकिंग घेऊन २०१८ पासून कोणतेही बांधकाम न करता ५० कोटींची फसवणुक करणार्‍या रविनंदा ग्रुपच्या संचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Ravinanda Landmarks)

समीर रवींद्र जैन Sameer Ravindra Jain (रा. अरिहंत हौसिंग सोसायटी, मार्केटयार्ड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत असोशिएशन ऑफ पर्सन्स रविनंदा टॉवर्स चे चेअरमन सुखजित सिंग निर्मल सिंग सैनी (रा. शुक्रवार पेठ) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर जैन हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांनी केसनंद येथील शेतकरी, जमीन मालकांबरोबर जॉईन्ट व्हेन्चर्स करारनामा २९ जुलै २०१५ मध्ये केला. जमीन मालक आणि बांधकाम व्यावसायिक समीर जैन यांच्यात ४० आणि ६० अशी टक्केवारी ठरविली होती. या करारनाम्यानुसार समीर जैन याने जिल्हाधिकारी व पुणे पीएमआरडीएईकडून आवश्यक परवानगी प्राप्त केले.

रविनंदा लँडमार्कस युनिट ५ व्यापारी व निवासी प्रकल्प ५ वर्षाच्या बांधण्याचा प्रकल्पाची घोषणा केली. त्यानंतर त्यांनी प्रकल्पांमध्ये नोंदणी सुरु केली. सुमारे १५० जणांनी या प्रकल्पामध्ये फ्लॅट घेण्यासाठी नोंदणी केली. प्रकल्पाचे बांधकाम सुरु झाले. यामध्ये ए, बी, सी, डी असे टॉवर्स बांधण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी बांधकामाला सुरुवात करण्यात आली. त्यात कोव्हिड आल्याने बांधकाम बंद पडले. या काळात या टॉवर्समधील ७ मजल्यांपर्यंत स्लॅब बांधण्यात आले होते. त्यानंतर बांधकाम पुढे सरकेना. फ्लॅट नोंदणी करणार्‍या नागरिकांनी वारंवार मागणी करुनही बांधकाम पूर्ण केले जात नव्हते. शेवटी या फ्लॅटधारकांनी असोशिएशनची स्थापना केली. त्याद्वारे प्रकल्पाचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. तरीही समीर जैन यांनी त्यांना दाद दिली नाही. शेवटी असोशिएशनने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. रविनंदा लँडमार्केस मध्ये १५० फ्लॅटधारकांकडून सुमारे ५० कोटी रुपये घेऊन फ्लॅट न देता फसवणूक केलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन खांदारे तपास करीत आहेत.

You may have missed