Pune Crime News | कौटुंबिक वादातून जावयाने सासर्‍याच्या दोन गाड्या दिल्या पेटवून; हडपसरमधील माळवाडी येथील घटनेत जावयावर गुन्हा दाखल

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सासरे आणि जावई हे शेजारी शेजारी राहतात. कौटुंबिक वादातून त्यांची पत्नी पतीबरोबर राहत नाही, या रागातून जावयाने सासर्‍याच्या दोन गाड्या पेटवून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यात एक मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली तर दुसरी अर्धवट जळाली आहे.

याबाबत अफसर गुलाब शेख (वय ५५, रा. कामठे वस्ती, माळवाडी, हडपसर) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी श्रीरंग सोपान गवलवाड Shrirang Sopan Gavalwad (वय ३०, रा. कामठे वस्ती, माळवाडी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना त्यांच्या राहते घरासमोर २१ ऑक्टोंबर रोजी रात्री ११ ते २२ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अफसर शेख आणि श्रीरंग गवलवाड हे सासरे जावई असून एकमेकांच्या शेजारी राहतात. श्रीरंग गवलवाड हे साफसफाईचे काम करतात. त्यांचे आणि पत्नीचे भांडण झाले असून गेल्या १ महिन्यांपासून ती त्यांच्याबरोबर राहत नाही. यावरुन या कुटुंबामध्ये वादावादी होत होती. शेख यांच्या टी व्हीएस अपाचे आणि बजाज डिस्क अशा दोन मोटारसायकली घराबाहेर लावल्या होत्या. श्रीरंग गवलवाड यांनी त्या मोटारसायकलीला कशाच्या तरी सहाय्याने आग लावली.  आग लागल्यानंतर खुप वेळाने शेख यांच्या ही बाब लक्षात आली. तोपर्यंत एक मोटारसायकल पूर्णपणे जळून खाक झाली होती. दुसरी अर्धवट जळाली आहे. पोलीस हवालदार निकम तपास करीत आहेत.

You may have missed