Pune Crime News | दारुच्या बाटलीचे पैसे मागितल्याने कामगाराच्या डोक्यात घातली बाटली; कामगार जखमी, हडपसरमधील घटना

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | रॉयल स्टॅग कॉटर दिल्यानंतर त्याचे पैसे मागितल्याचा राग मनात धरुन तीच बाटली कामगाराच्या डोक्यात मारुन त्याला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत अंकित बलेश्वर पांडे (वय २२, रा. राजगे आळी, ससाणेनगर रोड, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी व्यंकेश बाळु डोके Vyankesh Balu Doke (रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना हडपसरमधील अमृत बार आणि हॉटेल येथे २१ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित पांडे हे अमृत बार आणि हॉटेल येथे काम करतात. व्यंकेट डोके हा बारमध्ये आला. त्याने पांडे यांच्याकडे रॉयल स्टॅगची कॉटर मागितली. त्यांनी  डोके याच्याकडे पैसे मागितले. त्याचा त्याला राग आला. त्याने पांडे यांना शिवीगाळ करुन काऊंटरवरील रॉयल स्टॅगचा काचेचा खंबा घेऊन पांडे यांच्या डोक्यात मारल. पांडे हे बाजूला होत असतानाच तो खंबा त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वरती लागून ते जखमी झाले. पोलीस हवालदार तरडे तपास करीत आहेत.

You may have missed