Pune Crime News | अल्पवयीन मुलीचे लग्न रोखल्यानंतरही मुलाचे वडिल मुलीला घेऊन गेले घरी, मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला पोलिसांनी केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | अल्पवयीन मुलीचे लग्न ठाणे चाईल्ड हेल्पलाईनने रोखल्यानंतर त्याचे वडिल मुलीला त्यांच्या गावाला घेऊन गेले. तेथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे.

अतुल दादा झेंडे Atul Dada Zende (वय २३, रा. लोणंद, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे. याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोंव्हेबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अल्पवयीन मुलीचे अतुल दादा झेंडे याच्याबरोबर लग्न लावण्यात येणार होते. त्यावेळी ठाणे चाईल्ड हेल्पलाईन यांना समजल्यामुळे पोलिसांच्या मदतीने तिचे लग्न थांबवले. त्यानंतर नोव्हेबर २०२५ मध्ये अतुल झेंडेचे वडिल फिर्यादी यांना त्यांच्या लोणंद येथील घरी घेऊन गेले. फिर्यादी यांना मंगळसुत्र घालण्यास लावुन तिचे लग्न झाले असल्याचे भासवण्यास सांगितले. फिर्यादी या अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही अतुल झेंडे याने तिच्यासोबत शारीरीक संबंध ठेवले. बाणेर पोलिसांनी अतुल झेंडे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक शैला पाथरे तपास करीत आहेत.

You may have missed