Pune Crime News | ‘ड्राय डे’च्या दिवशी चक्क दारु विक्री; खडक पोलिसांनी 41 हजारांचा दारुचा साठा केला जप्त
पुणे : Pune Crime News | महात्मा गांधी जयंतीनिमित्त मद्य विक्री पूर्ण बंद असताना (ड्राय डे) दारुच्या बाटल्या विकणार्याला खडक पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ४१ हजार ९१० रुपयांचा माल जप्त केला आहे.
बलराम प्रताप परदेशी Balram Pratap Pardeshi (वय ४४, रा. घोरपडे पेठ) असे आरोपीचे नाव आहे.
२ ऑक्टोंबर रोजी महात्मा गांधी जयंती दिवशी मद्य विक्रीवर बंदी असते. पोलीस अंमलदार निलेश सांबळे व अमित जमदाडे यांना माहिती मिळाली की, घोरपडे पेठेत एक जण दारु विक्री करत आहे. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस पथकाने घोरपडी पेठेत जाऊन बलराम परदेशी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपनीच्या मद्याच्या ४१ हजार ९१० रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जºहाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, राहुल मखरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष मोहिते, विनोद शिंदे, पोलीस अंमलदार मयुर भोसले, अमित जमदाडे, हेमंत पेरणे, निलेश साबळे, उमेश मठपती, सैपुन मुलुख नदाफ व विकास पांडोळे यांनी केली आहे.
