Pune Crime News | (नर्‍हे) पुणे : फ्लॅटवर कर्ज असताना ते लपवून ठेवून रजिस्टर खरेदी खत करून फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरुन दोघांवर गुन्हा दाखल

Pune Crime News | (Narhe) Pune: A case has been registered against two individuals for fraud; they allegedly concealed the fact that there was an outstanding loan on a flat, executed a registered sale deed, and failed to hand over possession of the property.

पुणे : Pune Crime News |  फ्लॅटवर कर्ज असताना ते लपवून ठेवून रजिस्टर खरेदी खत करुन देऊन फ्लॅटचा ताबा न देता १८ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन दोघांवर नर्‍हे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत हेमलता राजू विटकर (वय ४८, रा. सुनीत सोसायटी, मॉडेल कॉलनी) यांनी नर्‍हे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी संजय लक्ष्मण आहेर Sanjay Laxman Aher (वय ४१), जयश्री लक्ष्मण आहेर Jayashree Laxman Aher (वय ३८, दोघे रा. बलभीम पार्क, वारजे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १० ऑक्टोंबर २०१७ मध्ये घडला होता .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्‍हे येथील त्रिमुर्ती पॅलेस इमारतीमध्ये चौथा मजल्यावरील फ्लॅट नंबर ४०३ हा ६९५ चौरस फुट या फ्लॅटवर जी आय सी फायनान्स यांचे १० लाख रुपयांचे कर्ज होते. असे असताना ही बाब आरोपींना माहित होती. असे असताना त्यांनी फिर्यादी व त्यांचे पती यांचा संजय आहेर  यांनी विश्वास संपादन केला. हा फ्लॅट रजिस्टर खरेदी खताने २३ लाख रुपयांना फिर्यादीस विक्री केला . त्या पोटी १८ लाख ५० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतरही त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही. त्यांनी वारंवार फ्लॅटचा ताबा देण्याची मागणी केली. परंतु, त्यांनी फ्लॅटचा ताबा दिला नाही. तसेच खरेदीपोटी दिलेली रक्कम वारंवार मागणी करुनही दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शेवटी त्यांनी फ्लॅट खरेदीपोटी दिलेली रक्कम परत न करता १८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक नागुल तपास करीत आहेत.

You may have missed