Pune Crime News | मॅफेड्रॉन (एम डी) पावडर विक्री करणार्या 6 आरोपींना पकडून लोणीकंद पोलिसांनी 42 लाखांचा माल केला जप्त
पुणे : Pune Crime News | लोणीकंद पोलिसांनी ४ वेगवेगळ्या कारवायांमध्ये एम डी पावडरची विक्री करणार्या ६ जणांना पकडून त्यांच्याकडून ४१ लाख ९६ हजार रुपयांचा १७५ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त केला आहे.
पुंजाजी जयचंद्र चौधरी Punjaji Jaychandra Chowdhury (वय ४०, रा. जय मल्हार सोसायटी, वाघोली, मुळ रा. निपाणा, ता. मोताळा, जि. बुलढाणा), राजेंद्र केरु टेळे Rajendra Keru Tele (वय ३५, रा. अथर्वनगर, चाकण रोड, शिक्रापूर), करण सचिन मोहिते Karan Sachin Mohite (वय २१, रा. सणसवाडी), भगीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित Bhagirathsingh Sajjansingh Rajpurohit (वय २८, रा. मांजरी, मुळ रा. राजस्थान), आदिनाथ दशरथ शिर्के Adinath Dashrath Shirke (वय २९, रा. मांजरी), योगेश लक्ष्मण चव्हाण Yogesh Laxman Chavan (वय ३७, रा. आझाद गल्ली, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुणे शहरातून अंमली पदार्थांच्या तस्करीवर रोख लावण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. अंमली पदार्थांची विक्री करणार्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याच्या सुचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे यांनी दिल्या होत्या. पोलीस अंमलदार कैलास साळुंके व स्वप्नील जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून माहिती मिळाली की, लोणीकंदमधील कटकेवाडी येथे एक तस्कर येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी पुंजाजी चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४ लाख ३७ हजार २०० रुपयांचे २१ ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडर, मोबाईल असा ४ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त केला.
पेरणे फाटा येथे २० एप्रिल रोजी राजेंद्र टेळे व करण मोहिते यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ११ लाख ८३ हजार रुपयांची ५९ ग्रॅम एम डी पावडर, कार, मोबाईल, रोख रक्कम असा १४ लाख १० हजार ९७० रुपयांचा माल जप्त केला.
भागीरथसिंग सज्जनसिंग राजपुरोहित याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ४ लाख २८ हजार ६०० रुपयांचे २१ ग्रॅम एम डी पावडर, ४ लाखांची कार,मोबाईल, रोख रक्कम असा ८ लाख ३४ हजारांचा माल जप्त केला. या तिघांना अटक करुन एकत्रित तपास केल्यावर त्यातून योगेश चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १४ लाख ५० हजार रुपयांचे ७२ ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज पावडर जप्त केली.
या कारवाईत ६ आरोपींना अटक करुन एकूण ४१ लाख ९६ हजार रुपयांचे १७५ ग्रॅम एम डी पावडर जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता रोकडे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेदगुडे, तुकाराम सुरवसे, पोलीस अंमलदार स्वप्निल जाधव, कैलास साळुंके, सागर जगताप, गणेश गायकवाड, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, सुधीर शिवले, दिनेश मरकड, शंकर क्षीरसागर, संदीप पाचंगे यांनी केली आहे.
