Pune Crime News | मुंढवा पोलिसांनी केलेल्या कॉल सेंटरच्या कारवाईत 18 लाखांची रोकड, 70 तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी जप्त

Pune Crime News | Mundhwa Police raid on call center: ₹18 lakh in cash, 70 tolas of gold jewelry, and 2.5 kg of silver seized.

पुणे : Pune Crime News | मुंढवा पोलिसांना एके ठिकाणी मोठी रक्कम असून त्या ठिकाणी दरोडा पडणार असल्याची खबर मिळाली होती. त्यावरुन मुंढवा पोलिसांनी १५ दिवस तपास केला. त्यातून बनावट कॉल सेंटरद्वारे ऑनलाईन गेमींग अ‍ॅप चालविले जात असून त्यातून दररोज शेकडो लोकांची फसवणूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले.

पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली मुंढवा पोलीस, सायबर पोलीस आणि काळे पडळ पोलिसांनी एकाच वेळी एकूण ३ कॉल सेंटर आणि २ घरावर छापे टाकून बनावट कॉलसेंटरचा भंडाफोड केला आहे. विशेष म्हणजे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमनोरा मॉल येथील ४ आणि ५ व्या मजल्यावर ही कारवाई सुरु झाल्यानंतरही हडपसर पोलिसांना याची काहीही कल्पना नव्हती.

याबाबत पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल यांनी माहिती दिली.  मुंढवा पोलीस, सायबर पोलीस, फुरसुंगी पोलीस आणि  काळेपडळ पोलिसांनी सयुक्तपणे कारवाई केली आहे. यातील प्रत्येक पथकाबरोबर सायबर तज्ञ, तसेच प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुणे /मुंबई येथील फॉरेन्सिक यांच्याकडील सायबर तज्ञ देण्यात देण्यात आले होते. या कारवाई संतोष वेंजणेकर याच्या भेकराईनगर येथील राहत्या फ्लॅटच्या झडतीत एक पिस्टल, ६ जिवंत काडतुसे, तसेच १८ लाख रुपये रोख, ७० तोळे सोन्याचे दागिने, अडीच किलो चांदी, विविध बँक खात्याची कागदपत्रे, पासबुक, एटीएम कार्ड, पॅन कार्ड, मोबाइल, लॅपटॉप तसेच भरपूर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे.

मुंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश राऊत यांना बातमीदाराद्वारे सर्वप्रथम माहिती मिळाली होती. दरोडा टाकण्यात येणार असल्याची खबर होती. या खबरीबाबत माहिती काढण्यास सुरुवात केली. त्यात बनावट कॉल सेंटरमधून ऑनलाईन गेमींगद्वारे लोकांची फसवणूक केली जाते. त्यातून मिळणार्‍या पैशांवर धाड टाकण्याचा प्लॅन असल्याचे समजले. त्यातून अमनोरा मॉल येथील ४ व्या ५ व्या मजल्यावर सुरु असलेल्या बनावट कॉल सेंटरची माहिती समोर आली. या दोन ठिकाणी छापा घातल्यानंतर फुरसुंगी येथेही एक कॉल सेंटर चालविले जात असल्याचे समजले. तेथे तसेच संतोष वेंजणेकर (Santosh Datta Venjanekar), विनायक इक्के (Vinayak, alias Deepak Manohar Ikke) यांच्या घरावर छापे टाकण्यात आले. या तीनही ठिकाणी तब्बल १२० तरुणतरुणींकडून हा गैरप्रकार सुरु होता. १० जून रोजी दुपारी सुरु झालेली ही कारवाई तब्बल १८ तास सुरु होती. या कारवाई दरम्यान शेकडो संगणक, हार्ड डिक्स, मोबाईल, कागदपत्रे व इतर तांत्रिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस उपायुक्त जीवन बेनीवाल, सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे, अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, स्वप्नाली शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पना सुरवसे, गणेश पिंगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, पोलीस अंमलदार शिवाजी जाधव, योगेश गायकवाड, राहुल मोरे, रुपेश तोडेकर, सचिन बोराटे, राहुल धोत्रे, शिवाजी धांडे, योगेश राऊत, अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, प्रशांत नायडु, तसेच परिमंडळ ६ मधील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे.

You may have missed