Pune Crime News | दारुच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणार्या पोलीस हवालदाराला अटक; पोलीस उपायुक्तांनी केले निलंबित
पुणे : Pune Crime News | विना परवाना कर्तव्यावर गैरहजर राहून दारुच्या नशेत तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन तिचा विनयभंग केल्याने चतु:श्रृंगी पोलिसांनी पोलीस हवालदाराला अटक केली आहे. पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी या पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.
बबन अशोक वाघ (Baban Ashok Wagh) असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तो सध्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होता.
पोलीस हवालदार बबन वाघ हा १७ जुलै २०२६ पासून विना परवाना कर्तव्यावर गैरहजर आहे. या कालावधीमध्ये त्याने ४ सप्टेंबर रोजी दारुच्या नशेत एका तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन तिचा विनयभंग केला. या तरुणीने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी बबन वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. त्याचा अहवाल चतु:श्रृंगी पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पाठविला.
शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी याची माहिती पोलीस उपायुक्त कार्यालयाला दिली.
बबन वाघ याच्या कृत्यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याने पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले यांनी बबन वाघ याला निलंबित केले आहे.
