Pune Crime News | पुणे : वाघोली, विमानतळ, चंदननगरमधील 7 सराईत गुन्हेगार 2 वर्षासाठी तडीपार

Pune Crime News | Pune: 7 notorious criminals from Waghole, Airport, and Chandan Nagar banned for 2 years

पुणे : Pune Crime News | गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी वाघोलीमधील ४ गुन्हेगार, विमानतळमधील २ आणि चंदननगर मधील एक अशा ७ सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून २ वर्षांसाठी तडीपार केले आहे.

वाघोली पोलीस ठाण्यातील गुन्हेगार आकाश बाळु वायकर Akash Balu Vaikar (वय २९, रा. खांदवेनगर, लोहगाव) आणि तानाजी अर्जुन जाधव Tanaji Arjun Jadhav (वय २६, रा. लाडबा वस्ती, केसनंद) यांच्यावर संघटित टोळी बनवून जबरी चोरी करणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे, तोडफोड करणे, चोरी करणे, घातक शस्त्र बाळगणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.

ओम दादाराव म्हस्के Om Dadarao Mhaske (वय १९, रा. दुबेनगर, गुरुदत्त सोसायटी, वाघोली) याच्याविरुद्ध गंभीर दुखापत करणे, दहशत पसरविणे, तोडफोड करणे, बेकायदेशीर घातक शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत.

भारत माखन निसार Bharat Makhan Nisar (वय २९, रा. भावडी रोड, वाघोली) याच्याविरुद्ध गावठी हातभट्टी दारु विक्री करीता जवळ बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत.

विमानतळ पोलीस ठाण्यात यश अनिल ओव्हाळ Yash Anil Ovhal (वय २१, रा. बर्मा सेल झोपडपट्टी, लोहगाव) याच्यावर दुखापत करणे, मारहाण करणे, दहशत पसरविणे, तोडफोड करुन घातक शस्त्रे बाळगणे, असे गुन्हे दाखल आहेत.

प्रितम प्रफुल्ल कुलकर्णी Pritam Prafull Kulkarni (वय ३८, रा. साईनाथनगर, वडगावशेरी) याच्याविरुद्ध जुगार खेळणे, अंमली पदार्थ विक्रीकरिता जवळ बाळगणे, असे गुन्हे दाखल आहेत.

चंदननगर पोलीस ठाण्यात सचिन राजेंद्र कापुरे Sachin Rajendra Kapure (वय २६, रा. रामवाडी मेट्रो स्टेशनसमोर) याच्याविरुद्ध जबरी चोरी करणे, गंभीर दुखापत करणे, मारहाण करणे असे गुन्हे दाखल आहेत.

परिमंडळ ७ च्या कार्यक्षेत्रातील १०० हून अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी सांगितले.

You may have missed