Pune Crime News | पुणे : गुंड बंडू आंदेकर टोळीमधील नाना पेठेतील सराईत गुंड अटकेत
पुणे: Pune Crime News | पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने नाना पेठेतील अभिलेखावरील एका आरोपीला अटक केली असून, तो कथितरीत्या बंडू आंदेकर टोळीशी संबंधित असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
अक्षय दशरथ अकोलकर Akshay Dashrath Akolkar (वय 33, रा. डोके तालीम चौक, नाना पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत खंडणी विरोधी पथकातील सहायक पोलीस फौजदार महेंद्र तूपसौंदर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अकोलकर याच्याविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागझरी नाल्याजवळ सापळा
पोलिसांच्या माहितीनुसार, 7 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास अकोलकर हा नागझरी नाल्याजवळ थांबला असून त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून कोयता जप्त करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जाधव करीत आहेत.
