Pune Crime News | मैत्रिणीला का मेसेज केला, जाब विचारत टोळक्याने तरुणाच्या डोक्यात स्टंप घालून केले गंभीर जखमी

Pune Crime News | Security guard injures auto-rickshaw driver by hitting him on the head with

पुणे : Pune Crime News | एकाच क्लासमध्ये शिक्षण घेत असलेल्या तरुणीला मेसेज केल्याने तिच्या मित्राने साथीदारांसह तरुणाला बोलावून त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. डोक्यात स्टंप घालून त्याला गंभीर जखमी केले आहे.

याबाबत ओमकार काळुराम आव्हाळे (वय २६, रा. पाटीलवाडा,  आव्हाळवाडी, वाघोली) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हर्षवर्धन अजित सोनवणे Harshvardhan Ajit Sonawane (वय २०, रा. विघ्नहर्ता सोसायटी, पर्वती पायथा, सिंहगड रोड) व त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना कोथरुडमधील पौड रोडवरील शिलाविहार कॉलनीतील किर्ती भवन बाहेर ३ जून रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आव्हाळे हे सायबर सिक्युरिटी संदर्भातील सायबर वोल्ट या क्लासमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या क्लासमधील एका मैत्रिणीला त्यांनी मेसेज केला होता. या मैत्रिणीचा मित्र हर्षवर्धन सोनवणे याने ओमकार याला फोन करुन क्लासच्या खाली बोलावले. तो खाली भेटायला आल्यावर हर्षवर्धन सोनवणे याने ‘‘तू माझ्या मैत्रिणीला मेसेज का करतो,’’ असे विचारले. त्यावर ओमकार याने ‘‘मी तिला फक्त माझ्या क्लाससाठी लागणाऱ्या नोट्स मागितल्या होत्या. त्यासाठी मेसेज केला होता. त्याच्या पलीकडे मी तिला कोणताही मेसेज केला नाही,’’ असे सांगितले. तरी त्याने काही एक ऐकले नाही़ ओमकार यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ बरोबरच्या तिघा मुलांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे ओमकार खाली पडला. तेथेच गल्लीत क्रिकेट खेळत असलेल्या मुलांचा स्टंप घेऊन हर्षवर्धन याने ओमकार यांच्या डोक्यात मारला. डोक्यातून रक्त यायला लागल्यावर रक्त पाहून ते पळून गेले. ससून रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांनी त्यांनी फिर्याद दिली. पोलीस हवालदार दळवी तपास करीत आहेत.

You may have missed