Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये 23 व 24 सप्टेंबर रोजी चित्रकला प्रदर्शन अभिनेते मोहन जोशी यांच्या हस्ते उद्घाटन

Pune Festival 2026

Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये बुधवार दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता बालगंधर्व कलादालन येथे सुप्रसिद्ध अभिनेते श्री. मोहन जोशी यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. या प्रसंगी कार्यक्रमास राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रकार चिंतामणी हसबनीस पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल उपस्थित राहणार आहेत. संयोजिका एडवोकेट अनुराधा भारती आहेत.

पुणे फेस्टिवलमध्ये आकृती चित्रकला प्रदर्शनाचे हे १९वे वर्ष असून यंदाच्या वर्षी सुप्रसिद्ध कलाकार सतीश गुजराल यांच्या विलक्षण कलाप्रवासाचे दर्शन घडवणारे एक आगळेवेगळे प्रदर्शन भरवले जाणार आहे.

एका राष्ट्राला आकार देणाऱ्या कलेचे साक्षीदार होण्याची संधी सर्व कलाप्रेमींना मिळणार आहे. सतीश गुजराल यांचा सात दशकांचा वारसा, त्यांची भव्य भित्तिचित्रे आणि कालातीत दृष्टी यांचा उत्सव साजरा करणाऱ्या या विशेष प्रदर्शनात एकूण ८० चित्र, ३० चित्रकार व एसएनडीटी कॉलेजच्या २० विद्यार्थिनी व तसेच श्रीमती शकुंतला हेमराज मुथा चित्रकला महाविद्यालयाच्या २५ विद्यार्थिनींनी भाग घेतला आहे.

You may have missed