Pune Festival 2026 | पुणे फेस्टिवल पाककला स्पर्धेत तन्वी शिंदे प्रथम; विद्यार्थी गटात ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्यांची बाजी

Pune Festival 2026 | Tanvi Shinde wins first in the Pune Festival cooking competition; in the student category, All India Shri Shivaji Memorial Society Hotel Management students take the lead

पुणे : Pune Festival 2026 |  ३८वा पुणे फेस्टिवल आणि महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी आणि हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी नैवेद्यम या संकल्पनेवर पाककला स्पर्धा घेण्यात आली. मॉडेल कॉलनी येथील केटरिंग कॉलेजच्या आवारात  पार पडलेल्या या स्पर्धेला महिलांचा आणि विद्यार्थ्यांचा भरपूर मोठा प्रतिसाद मिळाला.

महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या प्राचार्य डॉ. सीमा झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील २५ कॉलेज मधून विद्यार्थ्यांच्या सोळा गटांनी भारतात देवासाठी बनले जाणारे विविध प्रकारचे नेवैद्य / भोग अतिशय कल्पकता वापरून बनविले होते. स्पर्धक महिलांनी पारंपारिक पद्धतीने नैवेद्य बनवून आणले होते. ज्येष्ठ पाककला तज्ञ किशोर सरपोतदार, ज्योती पेशवे, तेजस्विनी देशपांडे आणि अमृता पटवा भालगत यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. किचन क्वीन स्पर्धेत तन्वी शिंदे, जुई कामेरकर आणि अरुणा जोशी यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले तर रंजीता मानकरे, ज्योती बनकर आणि विद्या ताम्हणकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली. विद्यार्थी गटामध्ये ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचे अद्वैय सोनावणे आणि मेहेरिन झाकी प्रथम विजेते आणि आय आय बी एम कॉलेजचे तनिषा मुरगुंड आणि वैभव शेघटने उपविजेते ठरले. विद्यार्थ्यांसाठीच्या स्पर्धेचे परीक्षण शेफ रत्नाकर जपे आणि शिल्पा घाटणेकर यांनी केले.

या वेळी उपस्थित महिलांसाठी लाईफ कोच सोनाली द्रविड यांनी महिला सक्षमीकरणावर कार्यशाळा घेतली. उद्योजिका सीमा दंताळे, उषा पूनावाला, लेखिका मंजू कायरा, पर्यावरण मित्र डॉ. अनिंदिता चौधरी, सौंदर्य तज्ञ अंजली जोशी, गायिका अनुपमा कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या देवी तन्ना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. पुणे फेस्टिवलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सांस्कृतिक कार्याक्रमांचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई, विश्वस्त मोहन टिल्लू यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला. पूनम बढे हिने सूत्रसंचालन केले. करुणा पाटील या समन्वयक होत्या.

You may have missed