Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘स्वर विलासिनी’ कार्यक्रमास मोठा प्रतिसाद
Pune Festival 2026 | पुणे फेस्टिव्हल अंतर्गत ‘स्वर विलासिनी’ हा दृकश्राव्य कार्यक्रम बियॉंड एंटरटेनमेंट तर्फे चित्रपट संजीत समीक्षक सुलभ तेरणीकर आणि उस्मान शेख ( फलटण) यांनी सादर केला. स्वर्कोकीला आशा भोसले यांच्या विविधतेने नटलेल्या संगीत प्रवासाचा वेध घेणारा हा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास वंदना कुलकर्णी, अनघा कोऱ्हाळकर यांचे सहकार्य लाभले.
या कार्यक्रमात अशा भोसले यांनी गायलेल्या हिंदी मराठी चित्रपट गीते भावगीते, नाट्यगीते असा मोठा आलेख मांडणार गेला.
प्रमुख पाहुणे म्हणून युवा संगीतकार आशुतोष कुलकर्णी उपस्थित होते व पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष श्री कृष्णकुमार गोयल यांनी सर्वांचा सत्कार केला. या कार्यक्रमास प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
