Pune Navratro Mahotsav | नवरात्रोत्सवाच्या तयारीला जोर; शिवदर्शनमधील लक्ष्मीमाता मंदिरात साकारतंय इंडोनेशियन मंदिर !

Pune Navratri Festival | Preparations for the Navratri festival gain momentum; an Indonesian-style temple is taking shape at the Lakshmimata Temple in Shivdarshan!

देशातील विविध मंदिरांनंतर यंदा भाविकांना अनुभवता येणार परदेशातील मंदिराची अनोखी प्रतिकृती; दहा लाखांहून अधिक भाविक भेट देण्याची अपेक्षा

पुणे : Pune Navratro Mahotsav | नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात तयारीला वेग आला आहे. यंदाच्या नवरात्रोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे मंदिर परिसरात साकारण्यात येणारी इंडोनेशियातील मंदिराची भव्य प्रतिकृती! देशातील विविध प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृतींचा अनुभव घेतल्यानंतर यंदा भाविकांना परदेशातील मंदिराची कलाकुसर आणि स्थापत्यशैली अनुभवता येणार आहे. काहीतरी वेगळे आणि नावीन्यपूर्ण सादर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत बागुल यांनी दिली.

दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांसाठी आकर्षक सजावट, धार्मिक कार्यक्रम आणि विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा इंडोनेशियातील मंदिराच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून भाविकांना भारतीय संस्कृतीसोबतच परदेशातील मंदिर स्थापत्यशैलीचीही ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या अनोख्या संकल्पनेमुळे यंदाच्या उत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त होणार आहे.

आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली ३२ वर्षांची परंपरा

पुणे नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३२ वर्षांपासून हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. धार्मिक परंपरेचे जतन करत दरवर्षी नवनवीन संकल्पना राबविण्यावर महोत्सवाच्या आयोजकांचा भर असतो. यंदाही भाविकांना एक वेगळा अनुभव देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा दहा लाखांहून अधिक भाविक महोत्सवाला भेट देतील, अशी अपेक्षा मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत बागुल यांनी व्यक्त केली.

भाविकांना उत्तम धार्मिक आणि सांस्कृतिक अनुभव मिळावा, यासाठी मंदिर समिती आणि आयोजकांकडून जय्यत तयारी सुरू असून, यंदाचा नवरात्रोत्सव विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.

You may have missed