Pune Rural Police | पुणे ग्रामीण जिल्ह्यात 13 ते 26 जूनपर्यंत जमावबंदी आदेश

Pune Rural Police | Assembly ban orders in Pune Rural district from June 13 to 26.

पुणे : Pune Rural Police | पुणे ग्रामीण जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश दिनांक 13 जून 2026 रोजी रात्री 12.05 वा. पासून ते 26 जून 2026  रोजी 24 वाजेपर्यंत वाजेपर्यंत लागू राहणार आहे.  

या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका आदी इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आवेशपूर्ण भाषणे करणे यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार शस्त्र बाळगण्यास परवानगी असलेल्या व्यक्तींना लागू राहणार नाही.

सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे.

You may have missed