Refcold India 2026 | पुण्यात दक्षिण आशियातील भव्य रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन शो रेफकोल्ड इंडिया 2026′ आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व परिषद
पुणे : Refcold India 2026 | इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनिअर्स (ISHRAE) तर्फे रेफकोल्ड इंडिया २०२६ या दक्षिण आशियातील भव्य आंतरराष्ट्रीय रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन या प्रदर्शन व परिषद याचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ ते २१ नोव्हेंबर २०२६ दरम्यान अॅग्रिकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे भरणार आहे.
रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील ‘कुंभमेळा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीन दिवसीय प्रदर्शन व परिषदेत भारतासह परदेशातील हजारो उद्योग व्यावसायिक, उत्पादक, तंत्रज्ञान पुरवठादार, कंत्राटदार, धोरणकर्ते, शासकीय प्रतिनिधी, निर्णयकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. 300 हून अधिक स्टॉल्समध्ये स्मार्ट, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, देश-विदेशातील उद्योग तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असेल.
रेफ्रिजरेशन क्षेत्रातील पुण्याचे योगदान
पुण्याची ओळख “भारतातील रेफ्रिजरेशनची राजधानी” म्हणून निर्माण झाली असून, शहरात रेफ्रिजरेशन क्षेत्रातील व्यावसायिक, उत्पादक, अभियंते, तंत्रज्ञ आणि तज्ज्ञांचे मजबूत नेटवर्क आहे. इशारे पुणे चाप्टर ने या क्षेत्रातील तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रेफ्रिजरेशन हँडबुक्स, कोल्ड स्टोरेज बेसिक्स व डिझाइन गाइड्स, तांत्रिक लेख, सादरीकरणे तसेच रेफकॉन आणि ग्रीन कॉनक्लेवस या सारख्या विविध उपक्रमांद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण आणि उद्योगाच्या विकासाला चालना देण्यात आली आहे.
शाश्वत तंत्रज्ञानावर विशेष भर
अन्नसुरक्षा, औषधनिर्मिती, आरोग्यसेवा, कृषी आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रांसाठी रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत. या क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर तांत्रिक परिवर्तन होत आहे. ऊर्जा आणि पाण्याचा वापर, पर्यावरणावरील परिणाम तसेच उच्च ग्लोबल वार्मिंग पोटेन्शिअल (GWP) असलेल्या रेफ्रिजरंट्सचा वापर यांसारख्या आव्हानांना सामोरे जाताना उद्योगाने ऊर्जा-कार्यक्षम प्रणाली, शाश्वत रेफ्रिजरंट्स, स्मार्ट तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपकरणे आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांचा स्वीकार करण्यास सुरुवात केली आहे.’ रेफकोल्ड इंडिया 2026′ मध्ये या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात येणार असून, उद्योगातील बदलते तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी, नवीन व्यवसायाच्या शक्यता आणि भविष्यातील विकासाच्या दिशांवर चर्चा होणार आहे.
रेफकोल्ड इंडिया 2026′ ची प्रमुख वैशिष्ट्ये
300 हून अधिक प्रदर्शन स्टॉल्समध्ये नाविन्यपूर्ण, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज उत्पादने व प्रणालींचे प्रदर्शन. रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व विकासाच्या संधींवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची व्याख्याने. उद्योगातील मान्यवरांच्या सहभागाने तज्ज्ञ परिसंवाद व पॅनेल चर्चा. उत्कृष्ट प्रकल्प, प्रणाली आणि उपकरणांसाठी रेफ्कोल्ड अवाईस. संशोधन व नाविन्याला प्रोत्साहन देणारी ग्लोबल पोस्टर स्पर्धा उद्योगातील नेते, उत्पादक, कंत्राटदार, धोरणकर्ते, शासकीय प्रतिनिधी आणि शैक्षणिक संस्थांशी नेटवर्किंगची संधी. ईशरे वुमेन मेम्बर्स आणि इंग्पृनेर्स प्रोग्राम नवीन उत्पादने, तंत्रज्ञान, भागीदारी आणि व्यवसायाच्या संधींचा शोध घेण्यासाठी विशेष व्यासपीठ.कोल्ड चेनच्या भविष्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ
रेफकोल्ड इंडिया 2026′ हे रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रातील संपूर्ण उद्योग परिसंस्थेला एकत्र आणणारे, ज्ञानाची देवाणघेवाण, सहकार्य आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे व्यासपीठ ठरणार आहे. स्मार्ट तंत्रज्ञान, शाश्वत रेफ्रिजरेशन प्रणाली आणि ऊर्जा-कार्यक्षम पायाभूत सुविधांच्या माध्यमातून पर्यावरणावरील परिणाम कमी करण्याबरोबरच तापमान नियंत्रित पुरवठा साखळी अधिक विश्वासार्ह आणि कार्यक्षम कशी करता येईल, यावर या प्रदर्शनात भर दिला जाणार आहे.
रेफकोल्ड इंडिया २०२६” या माध्यमातून जागतिक उद्योगातील नेते, नवोन्मेषक आणि धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर येणार असून, स्मार्ट, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज रेफ्रिजरेशन तंत्रज्ञानाचे सादरीकरण होईल. या माध्यमातून उद्योगाच्या विकासासाठी नव्या संधी निर्माण होतील. अन्नसुरक्षा, औषधनिर्मिती, आरोग्यसेवा आणि कृषी क्षेत्रासाठी कोल्ड चेन पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या होत असून प्रदर्शनाद्वारे त्या अधिक कार्यक्षम, सक्षम आणि शाश्वत कोल्ड चेनच्या उभारणीसाठी आवश्यक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. “अशी माहिती रेफकोल्ड इंडिया 2026 चे चेअरमन अरविंद सुरंगे व इतर उपस्थित अधिकारी यांनी पत्रकार परिषदे मध्ये दिली.
पुण्याची मजबूत औद्योगिक व अभियांत्रिकी पार्श्वभूमी आणि भारतातील वाढती कोल्ड चेनची गरज लक्षात घेता, रेफकोल्ड इंडिया 2026′ हे दक्षिण आशियातील रेफ्रिजरेशन आणि कोल्ड चेन क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण उद्योग संमेलन ठरण्याची अपेक्षा आहे.
या पत्रकार परिषदेस अरविंद सुरंगे, सुभाष खनाडे, दीपक वाणी तसेच इशरे चे वरिष्ठ सदस्य उपस्थित होते.
