Shri Mahalaxmi Temple, Sarasbaug | दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा पुढाकार; 10 गावांमधील पाणीपुरवठ्यासाठी करणार सहाय्य – विश्वस्त भरत अग्रवाल

Shri Mahalaxmi Temple, Sarasbaug | Initiative by Sarasbaug's Shri Mahalaxmi Temple to aid drought-affected areas; to provide assistance for water supply to 10 villages - Trustee Bharat Agrawal

पुणे : Shri Mahalaxmi Temple, Sarasbaug |  राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. अशा वेळी श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने राज्यात ज्या गावांमध्ये सर्वाधिक पाणी टंचाई आहे, त्याठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मदत करण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे विश्वस्त भरत अग्रवाल यांनी सांगितले.
श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्टच्या वतीने अन्नदाता शक्ती : शेतकरी महिला व कृषी उद्योजिकांचा सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

https://www.instagram.com/p/DeZb83tpZd6

भरत अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार आणि इतर नक्कीच मदतीचा हात देणार आहे. यामध्ये आपल्या क्षमतेनुसार आपणही मदत करावी, अशी भावना आहे. आज शेतकरी महिला व उद्योजिका यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्याशी संवाद साधल्यावर आम्हाला ही प्रेरणा मिळाली. राज्यातील ज्या गावांमध्ये पाणीटंचाई आहे, अशा गावांमध्ये त्यांच्या गरजे इतक्या क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या बांधून देण्यात येणार आहे. या महिलांशी तसेच सरकारशी बोलून या गावांची निवड करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात तेथे या पाण्याच्या टाक्या बसविल्या जातील.

https://www.instagram.com/p/DeZel47JAwR

You may have missed