Sr PI Suspended In Pune | 30 लाखांच्या दरोड्याचा गुन्हा ‘मिसिंग’ म्हणून नोंदविला; ‘मार्केटयार्ड’ वरिष्ठ पोलीस निरीक्षक तडकाफडकी निलंबित

Pune Crime News

पुणे : Sr PI Suspended In Pune | मार्केटयार्ड परिसरात रोकड घेऊन जाणार्‍यांना दुचाकीवरुन आलेल्या ५ जणांच्या टोळक्याने अडवुन ३० लाख रुपये लुटून नेले होते. या दरोड्याच्या गुन्ह्याची मिसिंगचा प्रकार म्हणून नोंद केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास तडकाफडकी निलंबित केले आहे. (Sr PI Vishwajit Jagtap)

विश्वजीत भाऊसाहेब जगताप (Vishwajit Bhausaheb Jagtap) असे या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे नाव आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सॅलसबरी पार्क येथे एका व्यापार्‍याला मारहाण करुन त्याच्याकडील साडेचार लाख रुपयांची बॅग चोरुन नेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, या व्यापार्‍याने बॅग सोडली नाही. तेव्हा लोक जमू लागल्याने हे चोरटे पळून गेले होते. स्वारगेट पोलिसांनी जबरी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन त्यांचा तपास केला. त्यात २०० सीसीटीव्ही तपासून निहाल नवनाथ अडागळे ( वय १९, रा. मुंढवा) आणि यश प्रवीण सोनवणे (वय २४, रा. मांजरी) यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली होती.

त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी मार्केटयार्डमधील एका व्यापार्‍याच्या कर्मचार्‍याला लुटून ३० लाख रुपये चोरुन नेल्याची कबुली दिली. ७ ऑक्टोंबर २०२६ रोजी ही घटना घडली होती. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी चौकशी केली. तेव्हा मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात मिसिंगचा प्रकार म्हणून त्याची नोंद करण्यात आली होती. दरोड्यासारख्या इतक्या मोठ्या गंभीर गुन्हा दडपून (burking) टाकला आहे. अशा रितीने गंभीर चूक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. यावरून तुमचे वर्तन हे बेशिस्तपणाचे व बेजबाबदारपणाचे असून शिस्तप्रिय पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांना निलंबित केले आहे.

You may have missed