Yerawada Jail News | पुणे : येरवडा जेलमध्ये गुंडांमध्ये तुंबळ हाणामारी; तंबाखु देण्यावरुन झाली होती भांडणे

Yerawada Jail News | Pune: Massive fight between goons in Yerawada Jail; Fight broke out over giving tobacco

पुणे : Yerawada Jail News | येरवडा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुंडांमध्ये तंबाखुच्या कारणावरुन भांडणे झाले. त्यातून दोघा गुंडांनी खुनाच्या आरोपाखाली कोठडीत असलेल्या गुंडावर छोट्या मापटेने डोक्यात मारुन जखमी केले.

शुभम पंढरीनाथ पोखरकर (वय २२, मुळ रा. दिघी) हा या घटनेत जखमी झाला आहे. वरिष्ठ तुरुंगाधिकारी रेवणनाथ कडू कानडे (वय ५७) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अजय शंकर राठोड आणि संतोष सुरेश भालेराव (दोघे सध्या रा. येरवडा कारागृह) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक २ बॅरेक क्रमांक ६ मधील बाहेरील बाजुला असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी पाण्याच्या हौदाजवळ २७ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तिघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अजय राठोड हा अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. संतोष भालेराव याने पिस्तुलाचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. शुभम पोखरकर व त्याच्या साथीदारांनी अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करुन त्याचा खुन केला होता.

या सर्व तिघांना बॅरेक ६ मधील सर्कल २ मध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यामध्ये तंबाखु देण्यावरुन भांडणे झाली होती. २७ मे रोजी शुभम पोखरकर हा शौचालयास जात असताना अजय राठोड यांने बंद्याचे जेवण वाटपासाठी असलेले छोटे मापटे त्यास लाकडी पट्टी होती. ती उचलून तंबाखुच्या कारणावरुन आमच्याशी वाद का घातला, असे म्हणत शुभम पोखरकर याच्या डोक्यात मारले. संतोष भालेराव याने प्लॅस्टिक बादली त्याच्या डोक्यात मध्यभागी व डोक्याच्या डाव्या बाजूला मारली. त्यामुळे त्याच्या डोक्यातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक कुंदन सत्रे तपास करीत आहेत.

You may have missed