Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke | निलेश लंके निवडून आल्याचे जाहीर केलेला निर्णय रद्द करण्याची मागणी; सुजय विखेंची कोर्टात याचिका

Sujay Vikhe Patil - Nilesh Lanke

नगर : Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke | अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे (Nagar Lok Sabha) खासदार निलेश लंके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले उमेदवार नीलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. निलेश लंके निवडून आल्याचा जाहीर केलेला निर्णय रद्द करावा अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. (Sujay Vikhe Patil On Nilesh Lanke)

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एकीकडं भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील आणि शरद पवार (Sharad Pawar NCP) यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये निलेश लंके यांचा अवघ्या २९ हजार मतांची विजय होऊन ते खासदार बनले होते.

लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रावर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या केंद्रावरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रावर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

त्यातच आता विखेंकडून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. माजी खासदार सुजय विखे यांनी ॲड. आश्विन होन यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेतून काही मतदान केंद्रांवरील मोजणीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. संबंधित ४० ते ४५ केंद्रांवरील मतमोजणी योग्य पद्धतीने झालेली नाही. त्याची पडताळणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे रितसर शुल्क भरून फेरपडताळणीची मागणी केलेली आहे.

याशिवाय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, नीलेश लंके व त्यांच्या प्रचारकांनी केलेली भाषणे
विखे पाटलांची खोटी बदनामी करणारी आहेत. तसेच नीलेश लंकेंनी दाखवलेला निवडणूक खर्च
आणि प्रत्यक्षातील खर्च यांचा ताळमेळ दिसून येत नाही. मुद्रित प्रचारातील साहित्याचा खर्च त्यांनी दाखवलेला नाही.

परिणामी लंकेंनी दाखवलेल्या निवडणुकीतील खर्चातल्या मर्यादेचे उल्लंघन झालेले आहे
,तसेच आदी मुद्यांवर सुजय विखे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
खंडपीठाने याचिका दाखल करून घेतली आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed