Dheeraj Ghate On Devendra Fadnavis Birthday | देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी दिव्यांग मुलांचा आनंद द्विगुणित झाल्याचे पाहून मनाला आत्मिक समाधान लाभले -धीरज घाटे

Dheeraj Ghate

पुणे : Dheeraj Ghate On Devendra Fadnavis Birthday | राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे लाडके नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी पुणे शहर भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने एक वेगळा सामाजिक उपक्रम केला. कसबा विधानसभा मतदारसंघातील (Kasba Assembly Constituency) सेवासदन येथील दिलासा केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात उपयुक्त ठरणारे कीट वाटण्यात आले. या कीटमध्ये कपडे, वह्या, पेन, कंपास पेटी, दप्तर आणि खाऊ यांचा समावेश होता. हे कीट हातात मिळाल्यावर या मुलांच्या चेहऱ्यावरील भाव बघून त्यांना झालेल्या आनंदाचे वर्णन करता येणार नाही. आपल्याला मिळालेले हे गिफ्ट बघून मुलं आनंदून गेली होती. कार्यक्रमात काही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत गीत म्हणत त्यांच्यातील कला सगळ्यांसमोर सादर केली.

या वेळी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले ,’समाजातील प्रत्येक घटकाचा विचार कायमच भाजपाने केला आहे. आम्ही केवळ एक पक्ष म्हणून काम करीत नाही, तर परिवार म्हणून काम करतो. त्यामुळे परिवारातील प्रत्येकाबद्दल आमच्या मनात आपलुकीची भावना असते. देवेंद्रजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे केंद्रातील मुलांचा आनंद द्विगुणित झाला’

कार्यक्रमाला शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समवेत संस्थेच्या संचालिका शहाणे, मुख्याध्यापक पवळे यांच्यासोबतच, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, मतदारसंघ अध्यक्ष राजेंद्र काकडे, शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर, स्वरदाताई बापट, माजी नगरसेवक राजेश येनपुरे, गायत्रीताई खडके, दिलीप काळोखे, अजय खेडेकर, आरती कोंढरे, योगेश समेळ, तुषार पाटील, नामदेव माळवदे, मनिष साळुंके, कसबा मतदारसंघाचे माजी अध्यक्ष प्रमोद कोंढरे, मतदारसंघाचे सरचिटणीस अमित कंक, उमेश चव्हाण, प्रणव गंजीवाले, राणी कांबळे, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, महिला अध्यक्ष अश्विनी पवार, पप्पू कोठारी, मनोज खत्री, निलेश कदम यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Dheeraj Ghate On Devendra Fadnavis Birthday)

शहर उपाध्यक्ष आनंद पाटील, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, अतुल पाटील व सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed