Pune Crime News | पिंपरी : धक्का लागल्याने 6 अल्पवयीन मुलांकडून तरुणाचा खून, भोसरीमधील धक्कादायक घटना

Murder

पिंपरी : Bhosari Pune Crime News | धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन बाचाबाची झाली. त्याचा राग आल्याने सहा अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला बेदम मारहाण करुन खून केल्याची धक्कादायक घटना भोसरी परिसरात घडली आहे (Murder In Bhosari Pune). ही घटना भोसरी येथील शांतीनगर (Shanti Nagar Bhosari) येथे शनिवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडली.

किरण बाळू लेंढघर (वय-28, रा. शांतीनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हर्षल बाळू लेंढघर (वय-32, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 21) भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सहा अल्पवयीन मुलांवर भारतीय न्याय संहिता कलम कलम 103(1), 189(2)(4), 191(2), 191(3), 190 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ किरण हा शॉप बंद करुन शांतीनगर येथील घराकडे पायी चालत येत होता. घराजवळ असताना त्यांचा एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला. दारूच्या नशेत असलेल्या अल्पवयीन मुलाने किरण यांच्याशी वाद घातला. त्यांची बाचाबाची झाली.
त्या रागातून अल्पवयीन मुलाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून निशांत ए अमन मस्जिदसमोर किरण याला शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
दारु पिलेल्या अल्पवयीन मुलाने सागर यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण केली.
किरण रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed