Puja Khedkar | पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला! कोणत्याही क्षणी होणार अटक

दिल्ली: Puja Khedkar | युपीएससी परीक्षेत घोटाळा (UPSC Exam Scam) करुन उमेदवारी मिळवणाऱ्या पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या पटियाला कोर्टाने (Patiala House Cout) आज (दि.१) फेटाळला (Anticipatory Bail Plea Rejected) . त्यामुळे पूजाच्या अडचणीत वाढ झाली असून तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. कालच पूजा खेडकरवर युपीएससीने कठोर कारवाई करत तिची उमेदवारी रद्द केली होती. तसेच भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यापासून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. (Puja Khedkar)
पूजा खेडकरचे अनेक घोटाळे समोर आल्यानंतर युपीएससीने तिच्यावर गुन्हा दाखल केला होता. तसेच तिला आपली बाजू मांडण्यासाठी ३१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेपर्यंतची मुदत दिली होती. पण पूजाने मुदत उलटून गेली तरी काहीच उत्तर दिले नव्हते.
तसेच पुणे पोलिसांनी (Pune Police) देखील पूजाला तीनदा समन्स पाठवून जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले होते. पण याची देखील तिने दखल घेतली नव्हती. दरम्यान, पूजाने दिल्लीच्या कोर्टात (Delhi Court) अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली होती. त्याचा निकाल कोर्टानं राखून ठेवला होता.
आज हा निकाल जाहीर करताना कोर्टाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यामुळे आता पूजाला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पोलिसांनी तिला शोधून अटकेची कारवाई करावी लागणार आहे.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर असाधारण मागण्यांमुळे चर्चेत आहे. खासगी वाहनांवर लाल दिवा लावणे, सरकारी चिन्हांचा वापर करणे, आयएएस अधिकाऱ्यासारख्या सुविधा मागणे, वेगळी कॅबिन, स्वतंत्र सरकारी बंगला अशा काही मागण्या त्यांनी केल्या होत्या.
या मागण्यांमुळे त्यांची वाशिम येथे बदली करण्यात आली होती. दरम्यान त्यांनी वाशिम येथे पुणे जिल्ह्याधिकारी सुहास दिवसे (Suhas Diwase) यांच्या विरोधात छळ केल्याची तक्रार केली होती.
दरम्यान खोटे दस्ताऐवज बनवल्या प्रकरणी यूपीएससीने गुन्हा दाखल केल्यानंतर आता दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. वकील वीणा माधवन (Adv Veena Madhavan) यांनी पुजा खेडकरची बाजू कोर्टात मांडली.
पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही क्रिमीलेअर सुविधेचा लाभ घेऊन ओबीसी कोट्यातून (OBC Quota) अर्ज केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, बेकायदेशीरपणे दिव्यांग असल्याची चुकीची कागदपत्रे (Fake Documents) सादर केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
How To Get Compensation | पाऊस आणि पुरामुळे घराचे झाले नुकसान, कशी मिळणार नुकसान भरपाई,
कोणत्या सरकारी विभागाकडे मागावी मदत, जाणून घ्या सविस्तर
Delhi-Mumbai Expressway | दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस-वे कधी सुरू होणार, किती काम पूर्ण आणि बाकी?
नितीन गडकरी यांनी संसदेत दिली सविस्तर माहिती
RBI Guidelines | केवळ OTP ने चालणार नाही काम, याच्याही पुढील विचार करा,
डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी RBI ची बँकांना महत्वाची सूचना