Prakash Ambedkar | ‘पवार, फडणवीस, ठाकरेंच्या गाड्या फोडा’, प्रकाश आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन
परभणी : Prakash Ambedkar | वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असतात. आज पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यातून ते कार्यकर्त्यांना गाड्या फोडण्याचं आवाहन करीत आहेत. शरद पवार (Sharad Pawar), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गाड्या फोडा असे थेट आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांच्या या आवाहनाला उपस्थितांनीही साद दिली. त्यामुळे येत्या काळात राज्यामध्ये गाड्या फोडाफोडीचे राजकारण रंगू शकते अशी चर्चा आहे.
या अगोदरच अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या गाड्या फोडण्यात आलेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. आता प्रकाश आंबेडकरांसारखा नेता गाड्या फोडण्याचं आवाहन करत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Prakash Ambedkar)
परभणी (Parbhani) जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये (Gangakhed) प्रकाश आंबेडकर बोलत होते.
त्यांच्या विधानामुळे राज्यामध्ये नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
आंबेडकरांनी थेट शरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे,अजित पवार यांचं नाव घेऊन त्यांच्या गाड्या फोडण्यासाठी चिथावणी दिली आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा