Yerawada Pune Crime News | प्रेमसंबंध पुन्हा ठेवले नाही तर जीवाचे बरेवाईट करण्याची तरुणाची धमकी; तरुणीच्या कार्यालयीन सहकार्‍याला मारहाण

marhan

पुणे : Yerawada Pune Crime News | ब्रेकअप नंतर प्रेमसंबंध पुन्हा ठेवले नाही तर जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी तरुणाने आपल्या पूर्वश्रमीच्या प्रेयसीच्या कार्यालयात जाऊन दिली. तेथील तिच्या सहकार्‍याला शिवीगाळ करुन धमकाविल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका २३ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerawada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी हर्षल सुधीर भोसले (वय २४, रा. सैनिकनगर, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोसायटीमध्ये २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी हर्षल भोसले त्यांच्यात पूर्वी प्रेमसंबंध होते. त्यांच्यात ब्रेकअप झाला होता. त्यानंतरही हर्षल हा सातत्याने फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध तिचा पाठलाग करुन पुन्हा प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी करत होता. तिच्या कार्यालयात येत होता. प्रेमसंबंध पुन्हा सुरु ठेवले नाही तर त्याचे जीवाचे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी तो कार्यालयात येऊन देऊ लागला. तेव्हा फिर्यादीच्या कार्यालयीन सहकारी मदतीला आला. त्याला हर्षल भोसले याने शिवीगाळ करुन धमकावले. या प्रकाराने घाबरुन फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक टकले तपास करीत आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरच्या कागल मतदारसंघावर शरद पवारांनी खास लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. कारण, तिथून लढण्यासाठी शरद पवार गटाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे असलेल्या समरजित घाटगे यांना गळ घातल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. याचाच अर्थ अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या हसन मुश्रीफांना तगडा चेकमेट देण्याचा शरद पवारांचा डाव असल्याची चर्चा आहे.

समरजित घाटगे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ते म्हणाले , ” शरद पवार गटामध्ये तशी चर्चा सुरू आहे. मात्र, मी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
उमेदवारीबाबत सगळ्या चर्चा माध्यमांवरच बघत आहे”,
अशी प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी दिली. (Kagal Assembly Constituency)

एकीकडे समरजित घाटगेंनी भविष्यातील भूमिकेबाबत वक्तव्य केलेले नसले तरी हसन मुश्रीफ
यांनी मात्र निवडणूक कशीही झाली तरी आपणच आमदार होणार, असे वक्तव्य केले आहे.
कुणीही लढा, मी चिंता करत नाही, असेही ते म्हणाले.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sinhagad Road Pune Flood | डोळ्यांदेखत बुडाला संसार; सिंहगड रस्त्यावरील पुरात कुटुंबाचे नुकसान

Pune Crime News | गटारीला जेवायला घालून कोयत्याने डोक्यात वार करुन केले गंभीर जखमी

Ajit Pawar NCP Baramati | ‘येत्या 8 दिवसात पक्ष पदाधिकाऱ्यांनी राजीनामा द्या’; अजित पवारांचा आदेश; खांदेपालट होण्याचे संकेत

Murder Due To Immoral Relationship | अनैतिक संबंधाच्या संशयावरून गुप्तीने भोसकून तरुणाचा खून

Pune Crime Court News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्या प्रकरणी बॅंक कर्मचाऱ्याला जामीन मंजूर

You may have missed