Mundhwa Pune Crime News | 15 वर्षाच्या मुलाची लपाछपी 14 वर्षाच्या मुलीला पडली महागात ! झाली पाच महिन्यांची गर्भवती
पुणे : Mundhwa Pune Crime News | आत्याच्या १५ वर्षाच्या नातूने लपाछपी खेळण्याचे बहाण्याने १४ वर्षाच्या मुलीवर जबरदस्तीने शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यातून ही मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत मुलीच्या आईने मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फिर्याद दिली असून पोलिसांनी १५ वर्षाच्या मुलावर पोक्सो अंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे. दोघेही अल्पवयीन आहेत. हा प्रकार मार्च २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून मे २०२४ दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा व मुलगी हे नातेवाईक आहेत. मुलाने मुलीला लपाछुपी खेळण्याच्या बहाण्याने पहिल्या मजल्यावर नेले. तेथे आपण सेक्स करुया, खूप मज्जा येते, पण कोणाला याबद्दल बोलायचे नाही, असे सांगितले. तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले. असे ४ ते ५ वेळा त्याने केले. त्यातून ही मुलगी ५ महिन्यांची गर्भवती राहिल्यावर हा प्रकार समोर आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत. (Mundhwa Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Sanjay Rathod News | मंत्री संजय राठोड पुन्हा अडचणीत?; भूखंड आपल्याच संस्थेला मिळवून दिल्याचा आरोप
Viman Nagar Pune Crime News | गांजा विक्रीसाठी आलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद