Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर आयोजित महिला मेळाव्याला 4 हजार भगिनींची उपस्थिती; सर्व महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे फॉर्म भरले (Video)

कोथरूड (पुणे) : Amol Balwadkar | भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या माध्यमातून महिला मेळावा (Mahila Melava) आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम जीत मैदान, परमहंस नगर, कोथरुड (Paramhans Nagar Kothrud) येथे महिलांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून अमोल बालवडकर यांच्या मातोश्री यावेळी उपस्थित होत्या.
या मेळाव्यामध्ये महिलांच्या कलागुणांना, आणि कर्तुत्वाला वाव मिळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सोबत शासनाच्या विविध योजना, महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेल्या कायदे व नियमांची माहिती देण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.
महिलांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी असे मेळावे आयोजित करणे महत्वाचे असल्याचे अमोल बालवडकर यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये सुमारे ४ हजार महिलांनी सहभागी होवून कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी सर्व महिलांचे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे (Ladki Bahin Yojana) फॉर्म अमोल बालवडकर यांच्या वतीने भरून घेण्यात आले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अमोल बालवडकर यांचे बंधू, मित्रपरिवार यांची मोलाची साथ लाभली.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्या गुन्हेगाराला अटक
Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)