Sharad Pawar On NDA Modi Govt | ‘लोकसभेला मोदी 400 पार सांगत होते, दिल्लीत त्यांचे सरकार आले नसते पण…’, शरद पवारांचे वक्तव्य; म्हणाले – “सत्तेचा गैरवापर…”

Sharad Pawar-Narendra Modi

चिपळूण : Sharad Pawar On NDA Modi Govt | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला (Sharad Pawar NCP) मोठे यश मिळाले. १० पैकी ८ खासदार निवडून आले. दरम्यान आता आगामी विधानसभेसाठी (Maharashtra Assembly Election 2024) शरद पवार यांनी रणनीती आखत मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शरद पवार राज्यातल्या विविध भागात दौरे करत आहेत. रत्नागिरी दौऱ्यावर (Sharad Pawar Ratnagiri Visit) असताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे.

https://www.instagram.com/p/DASgQ7AC-OH/?img_index=1

शरद पवार म्हणाले, “सत्तेचा गैरवापर केला जातो. तुमच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही. या देशात परिवर्तनाची गरज आहे. ती गरज तुम्ही काही प्रमाणात भागवली. लोकसभा निवडणुकीत मोदी ४०० पार सांगत होते. त्याखाली येत नव्हते. ही भाषा बोलत होते. त्यांना भारताच्या जनतेने २४० जागा दिल्या.

https://www.instagram.com/p/DASejKNJE53

चंद्राबाबू, नितीश कुमार या दोन मुख्यमंत्र्यांची मदत झाली नसती तर दिल्लीतील मोदींचे सरकार तयार झाले नसते. पण तरीही यातून काही शिकले पाहिजे. त्या प्रकारची भूमिका घेतली जात नाही, असे शरद पवार यांनी एका सभेत सांगितले.

https://www.instagram.com/p/DAScxq0ptls

“मुस्लिम समाजाबद्दल (Muslim Samaj) भाजपा व त्यांचे नेते चुकीचे वक्तव्य करत आहेत. सत्ता त्यांच्या डोक्यात गेली आहे. आता त्यांची जागा त्याला दाखवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही. काँग्रेसवर मोदी टीका करत आहेत. काँग्रेसचे पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी हिंदुस्तानसाठी दिलेले योगदान मोठे आहे. इंदिरा गांधी या सगळ्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

https://www.instagram.com/p/DASU34rCrpK/?img_index=1

“त्याच्या हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा गैरवापर केला जातो. समुद्राच्या वाऱ्यावर सुद्धा पैसे खाल्ले जातात. माझी एक सवय आहे, मी वेळ असेल तर शक्यतो गाडीनेच प्रवास करतो. त्यामुळे आपल्याला रस्ते कसे आहेत ते कळतात. चिपळूण ते कराड या रस्त्याची दुरावस्था पाहिली तेव्हा लोकांना विचारले हे रस्ते इतके खराब कसे, तेव्हा कळले की हा रस्ते तीन वेळा दुरुस्त झाला. म्हणजेच यातून किती भ्रष्टाचार करावा लागतो हे दिसते आहे”, म्हणत शरद पवार यांनी निशाणा साधला.

https://www.instagram.com/p/DARDCNoiYSu

“दरम्यान, देशाचे पंतप्रधान म्हणतात, गांधी कुटुंबाने देशाला लुटले. काय वाटले पाहिजे बोलायला. राजीव गांधी देशासाठी सर्व दिले. त्यांची पत्नी सोनिया गांधी त्यांच्याबद्दल आम्ही राजकीय भूमिका घेतली. पण सोनिया गांधींनी परदेशात जाण्याचा विचार केला नाही. त्यांनी देशाची बांधिलकी ठेवली.

https://www.instagram.com/p/DARB2-Wiosl

त्या आणि त्यांची पिढी देशाच्या भल्याचा विचार करतात. देशाबाबत आस्था दाखवतात.
असे असताना पंतप्रधान भ्रष्टाचाराची पिढी म्हणतात. माझ्यासारख्यांना आश्चर्य वाटते.
देशाचा पंतप्रधान या पद्धतीने कसे बोलू शकतात”, असे सांगत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. (Sharad Pawar On NDA Modi Govt)

https://www.instagram.com/p/DAQ-wzpi0v5

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Vanraj Andekar Murder | वनरात आंदेकर खून प्रकरणात गुन्हेगारांमधील दुवा साधणार्‍या गुन्हेगाराला अटक

Hadapsar Pune Crime News | दारुच्या व्यसनाविषयी आई, पत्नीला सांगत असल्याने तरुणाचा खून !
सोलापूरहून आरोपीला घेतले ताब्यात, 12 तासात गुन्हा उघडकीस (Video)

You may have missed