Pimpri Chinchwad To Swargate Metro | पुणे मेट्रो: पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो प्रवास अवघ्या 30 रुपयांत ! रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून सेवा सुरू
पुणे: Pimpri Chinchwad To Swargate Metro | शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गीका आज (रविवार) दुपारी चार वाजल्यापासून वाहतुकीसाठी खुली होणार आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड ते स्वारगेट दरम्यान प्रवाशांना अवघ्या ३० रुपयांत विनाविलंब प्रवासाची सुविध उपलब्ध होणार आहे. गर्दीच्यावेळी दर सात मिनिटांनी तर कमी गर्दीच्यावेळी दर दहा मिनिटांनी ही सुविधा उपलब्ध होणार आहे. तर स्वारगेट पासून मंडई अवघ्या दहा रुपयांत आणि जिल्हा न्यायालयापासून मंडई स्थानकापर्यंतचा प्रवासासाठी पंधरा रुपये खर्च येणार आहे. (Pune Metro)
स्वारगेट ते जिल्हा न्यायालय मेट्रो सुरू झाल्याने पिंपरी चिंचवड, रामवाडी आणि वनाज परिसरातून शहराच्या मध्यवर्ती भागात येणार्या प्रवाशांची विनाविलंब सोय होणार असल्याने सणासुदीच्या काळात मध्यवर्ती शहरातील खाजगी वाहनांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
https://www.instagram.com/p/DAdi_yDpRi9/
महामेट्रोच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गीकां पुर्णपणे सुरू होत आहेत. या मार्गीकांवरील काही स्टेशनची कामे अद्याप अपूर्ण असली तरी प्रवासी वाहतुकीस कुठलिही अडचण नसल्याचे मेट्रो प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसारच या दोन्ही मार्गीकांवरील काम जसजसे होत गेले तसतशी टप्प्याटप्प्याने मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. यातील शेवटच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भुयारी मार्गातील सेवा रविवारी सुरू होत आहे. यामुळे वडगावशेरी, येरवडा, पिंपरी चिंचवड, खडकी, कोथरूड परिसरातून शिवाजीनगर आणि शहराच्या मध्यवर्ती मंडई आणि स्वारगेट परिसरात येणार्या नागरिकांना विनाविलंब सेवा उपलब्ध होणार आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य बाजार पेठेतील अरुंद रस्ते, त्यावरील अतिक्रमणे आणि पार्किंगसाठी अपुरी जागा असल्याने सातत्याने वाहतूक कोंडी पाहायला मिळते. मध्यवर्ती शहरातून बाहेर पडण्यासाठी एकेरी मार्गावरून धावणारी पीएमपी सेवा असली तरी वाहतुक कोंडीमुळे अवघे चार कि.मी.चे अंतर प्रवासासाठी अर्धा ते पाउणतास वेळ जातो. तर वरिल उपनगरातून मंडई आणि स्वारगेट परिसरात येण्यासाठी त्याहून अधिक विलंब होतो. मात्र, स्वारगेट पर्यंत मेट्रो उपलब्ध झाल्याने नागरिकांना झटपट सुविधा मिळणार आहे.
https://www.instagram.com/p/DAdfBi5imA1
असे असतील तिकिट दर
पुणे मेट्रोचा सर्वाधिक तिकिट दर ३५ रुपये आहे.
पीसीएमसी ते स्वारगेट- ३० रुपये
वनाज ते स्वारगेट – २५ रुपये
रामवाडी ते स्वारगेट – ३५ रुपये
https://www.instagram.com/p/DAddM0mi6ri
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)