Lonikand Pune Police News | लोणीकंद पोलिसांनी दोघांकडून हस्तगत केले पिस्तुल आणि 3 जिवंत काडतुसे; महिन्याभरात 8 गावठी पिस्तुले, 26 जिवंत काडतुसे जप्त (Video)

Lonikand Police

पुणे : Lonikand Pune Police News | तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरुन नेणार्‍या दोघा जणांना लोणीकंद पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. गेल्या ३० दिवसात लोणीकंद पोलिसांनी ८ गावठी पिस्तुले आणि २६ जिवंत काडतुसे जप्त करुन संभाव्य गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. (Pistol Sized)

https://www.instagram.com/reel/DAfSw5Npxq6/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

सचिन राजाराम ढोरे Sachin Rajaram Dhore (वय ३८, रा. ढोरे वस्ती, केसनंद, ता. हवेली) आणि मंथन दत्तात्रय धुमाळ Manthan Dattatraya Dhumal (वय २६, रा. साईनगर, खराडी, चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

https://www.instagram.com/p/DAfXN8QpcLA

तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरुन नेण्याचा प्रकार लोणीकंदमध्ये १४ सप्टेबर रोजी घडला होता. याचा तपास सुरु असताना पोलीस नाईक स्वप्निल जाधव यांना २८ सप्टेंबरला पहाटे बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी केसनंद येथील बांगर वस्तीत सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या झडतीमध्ये १ गावठी पिस्तुल व ३ जिवंत काडतुसे तसेच मारुती स्विप्ट कार असा ५ लाख २३ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. न्यायालयाने दोघांना ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

https://www.instagram.com/p/DAfZk-ApHT1

लोणीकंद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड (PI Pandit Rejitwad) यांच्या नेतृत्वाखाली मागील ३० दिवसात ८ गावठी पिस्तुले व २६ जिवंत काडतुसे जप्त करुन शहरातील गुन्हेगारीस आळा घालून मोठी कामगिरी केली आहे.

https://www.instagram.com/p/DAfUjUiiMoZ

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील (IPS Manoj Patil), पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव (DCP Himmat Jadhav), सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे (ACP Pranjali Sonvane), अनुजा देशमाने (ACP Anuja Deshmane) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे (API Ravindra Godse), पोलीस अंमलदार संदीप तिकोणे, कैलास साळुंके, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, सांगर जगताप, शुभम चिनके, साईनाथ रोकडे, पांडुरंग माने, मल्हारी सपुरे, दिपक कोरे, सुधीर शिवले, विशाल गायकवाड, प्रशांत कापुरे, सागर कडु, शुभम सातव यांनी केली आहे. (Lonikand Pune Police News)

https://www.instagram.com/p/DAfQcajpxPu

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Nirmala Sitharaman | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपात FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश; राजकीय वर्तुळात खळबळ

Supriya Sule On Mahayuti Govt | सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारला इशारा; म्हणाल्या – ‘जेव्हा निवडणुका होतील तेव्हा…’

Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)