Maharashtra Mahayuti Govt | नवीन योजनांच्या घोषणेमुळे राज्य सरकार आर्थिक डबघाईला; वित्त विभागाकडून चिंता व्यक्त; विरोधानंतरही अनेक योजनांना मंजुरी

मुंबई : Maharashtra Mahayuti Govt | आगामी विधानसभा (Maharashtra Assembly Election 2024) डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारने विविध योजना जाहीर केल्या आहेत. ज्यामुळे आर्थिक ताण सरकारी तिजोरीवर येत आहे. सरकारने जाहीर केलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेवर (Ladki Bahin Yojana) दरवर्षी ४६,००० कोटी रुपये खर्च करणार आहे, ज्यामुळे अतिरिक्त आर्थिक दबाव वाढत आहे.
https://www.instagram.com/p/DAf_IUKp5mv
याव्यतिरिक्त, अन्नपूर्णा योजने अंतर्गत, राज्य दारिद्र्यरेषेखालील घरांना तीन मोफत सिलिंडर प्रदान करणार आहे. मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींच्या उच्च शिक्षणासाठी शिक्षण आणि परीक्षा शुल्क सरकार १०० टक्के भरणार आहे.
https://www.instagram.com/p/DAf7shdCxzj
सरकार नवीन योजनांच्या घोषणेमुळे आर्थिक दबावाला सामोरं जात आहे, असं राज्याच्या वित्त विभागाने म्हटलं आहे. तसेच वित्त विभागाने याबाबत चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान क्रीडा विभागाने क्रीडा संकुल बांधण्यासाठी १,७८१,०६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु वित्त विभागाच्या नकारात्मक टिप्पणीनंतर सरकारने ही मंजुरी दिली आहे.
https://www.instagram.com/p/DAf1JaEiv20
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, राज्य क्रीडा विकास समितीने क्रीडा संकुलासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मागितली. वित्त विभागाच्या विरोधानंतरही, या आठवड्यात शासनाने या अनुदानांची मंजुरी दिली.
https://www.instagram.com/p/DAfz2MpJ5ft
या मंजुरीत, १५५.२६ कोटी रुपयांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसह १४१ क्रीडा संकुलांची मंजुरी देण्यात आली आहे.
त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र सरकारला आर्थिक ताणाचा सामना करावा लागणार आहे.
https://www.instagram.com/p/DAfq_C9Cqh0
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Vadgaon Sheri Assembly Constituency | वडगावशेरी मतदारसंघात महायुतीला खिंडार !
महानिर्धार मेळव्यात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाती घेतली तुतारी; शरद पवार गटाचा विजयाचा महानिर्धार (Video)