Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘आमची मुलगी कोठे’ असे विचारुन तरुणाचे अपहरण करुन केली मारहाण; बीडमधील पाच जणांवर गुन्हा दाखल

Kidnapping Case

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | आमच्या मुलीला कोठे ठेवले आहे, असे विचारुन तरुणाचे अपहरण करुन त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याचे देहुरोड फाटा येथून अपहरण करीत बीडला घेऊन गेले. तेथे वडिलांच्या ताब्यात दिले. वाटेत जाताना त्याला सिगारेटचे चटके देऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Kidnapping Case)

https://www.instagram.com/p/DA5hRh8CpJH

याबाबत एका २० वर्षाच्या तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अजित शेंडगे, बाळासाहेब गायकर, बाबासाहेब शिरोळे (रा. खेडकर वस्ती, कडा, ता. आष्टी, जि. बीड), शेंडगे सर आणि प्रविण खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार देहुफाटा येथे रविवारी रात्री साडेदहा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टेल्को कंपनीत कामाला आहे. ते घरी झोपले असताना रात्री आरोपी घरात शिरले. तू आमच्या मुलीला कोठे ठेवले आहे, असे विचारुन रुममधून जबरदस्तीने खाली घेऊन आले. त्यांनी आणलेल्या टाटा टियागो चारचाकी गाडीत बसविले. रुममधील इतर मुलांना याच्या घरच्यांना कळविले तर याद राखा तुम्हाला पुण्यात राहू देणार नाही, अशी धमकी दिली. अजित शेंडगे याने लोखंडी पाईपने फिर्यादीच्या पाठीला मारहाण केली. बाळासाहेब गायकर याने वायरने फिर्यादीचे पायावर, हातावर मारहाण केली.

बाळासाहेब शिरोळे याने फिर्यादीच्या गळ्याला चाकू लावला व तुला आता मारुन इकडेच फेकून देतो, आमची मुलगी कुठे आहे, ते सांग, असे बोलून गळ्याला चाकू टोचला. शेंडगे सर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रविण खेडकर याने गाडी चालवित असताना शिवीगाळ करुन याला कापून टाकू मारु असे बोलला. त्यानंतर फिर्यादी तरुणाला गाडीमध्ये बसवून रात्रभर मारहाण केली. फिर्यादीचे अंगावर ते पित असलेल्या सिगारेटचे चटके दिले. सकाळी ५ वाजता फिर्यादीस त्याच्या मुळ गावी कडा येथे वडिलांच्या ताब्यात दिले. त्यानंतर फिर्यादी यांनी पुण्यात आल्यावर फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक शंभु रणवरे (PSI Shambhu Ranaware) तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA5SKXCJOeF

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed