Sahakar Nagar Pune Crime News | पुण्यातील ३२ वर्षाच्या महिलेचे अपहरण करुन कर्जतच्या जंगलात अत्याचाराचा प्रयत्न

Kidnapping

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | पुण्यातील महिलेचे अपहरण (Kidnapping Case) करुन तिला कर्जतमध्ये डांबून ठेवले. त्यानंतर तिला कर्जतच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

https://www.instagram.com/p/DA5NGFMpQRd

याप्रकरणी ३२ वर्षाच्या महिलेने सहकारनगर पोलिसांकडे (Sahakar Nagar Police) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ३६ वर्षाचा पुरुष आणि ३२ वर्षाची महिला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पुणे व कर्जत येथील जंगलात ६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोंबर २०२४ दरम्यान घडला आहे.

https://www.instagram.com/p/DA5XTqzJM5G

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या सहकारनगर भागात राहतात. आरोपी पती पत्नी असून त्यांच्याजवळच राहतात. महिलेने फिर्यादी यांना आपल्या घरी नेऊन हाताने मारहाण करुन डांबून ठेवले. त्यानंतर ३६ वर्षाच्या पुरुषाने बळजबरीने त्याच्या गाडीत बसवून कर्जत येथे नेवून तेथे दोन दिवस हॉटेलमध्ये ठेवले.

नंतर जंगलात नेऊन फिर्यादीच्या गळ्यातील मंगळसुत्र हिसकावून फिर्यादीवर जबरदस्ती
करण्याचा प्रयत्न केला. त्याला फिर्यादीने विरोध केल्यावर जीवे मारण्याची धमकी देऊन
फिर्यादीच्या मोबाईलवरील फोन पेचा पासवर्ड घेऊन त्यांच्या अकाऊंटमधील ७१ हजार रुपये काढून घेतले.
पुण्यात आल्यानंतर आता त्यांनी फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DA5hRh8CpJH

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed