Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवारांना कायदेशीर नोटीस

Eknath-Shinde-Ajit Pawar

पुणे : Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजना राजकीय दृष्ट्या प्रेरित असून केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लागू केली असल्याचे म्हणत या योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. पत्रकार लेखक आणि राजकीय विश्लेषक विनय हर्डीकर (Vinay Hardikar) यांनी ऍड. असीम सरोदे (Adv Asim Sarode) यांच्यामार्फत ही नोटीस पाठवली आहे.

https://www.instagram.com/p/DA-TMdSpIXJ

लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे महिलांची आर्थिक परिस्थिती, आरोग्य आणि पोषण हे दीड हजार रुपयांमध्ये कसे सुधारणार? हे सरकारने स्पष्ट करावे अशी मागणी नोटीसीतून करण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DA-P_CJpvZQ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर दरवर्षी तब्बल ४६ हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यासाठी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडला आहे. हे सत्य सरकार लपवत आहे, असे असीम सरोदे यांनी नोटीसीत म्हटलं आहे.

https://www.instagram.com/p/DA-NipwJAV9

राज्य सरकारने जर विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना सुरू केली असती आणि पुढील ५ वर्षे महिलांना लाभ दिला असता तर योजनेच्या हेतूवर शंका उपस्थित झाली नसती, असे कायदेशीर नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/DA-KmqUiJzg

या योजनेमुळे रोजगार निर्मिती होणार हा दावा पोकळ आणि निराधार आहे, असा आरोप देखील करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसाच्या आत या नोटीसीला उत्तर द्यावं, असं नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.

https://www.instagram.com/p/DA8uAzBJgSY

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव आणि महिला व बाल विकास मंत्रालयाला सुद्धा ही नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून या नोटीसीला नेमकं काय उत्तर दिलं जाणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Ladki Bahin Yojana)

https://www.instagram.com/p/DA8qCRMiPX1

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed