Maharashtra Assembly Election 2024 | विधानसभा जिंकण्यासाठी भाजपकडून खास रणनीती; 30 मतदारसंघात बलाढ्य उमेदवार उतरवणार तर बंडखोरी रोखण्याची ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी

Amit-Shah-On-Devendra-Fadnavis

मुंबई: Maharashtra Assembly Election 2024 | हरियाणातील यशानंतर आता भाजपने महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकीच्या जागावाटपाबाबत भाजपाने खास रणनीती आखली आहे. तसेच या रणनीतीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. या रणनीती अंतर्गत पुणे, मुंबई आणि विदर्भावर खास लक्ष देण्यात येत आहे. (BJP Strategy For MH Election 2024)

https://www.instagram.com/p/DA-0iNBpj1E

पुणे, मुंबई आणि विदर्भातील ३० हून अधिक जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये तीव्र मतभेद आहेत. या ठिकाणी महायुतीकडून उमेदवारांची घोषणा सर्वात आधी करण्यात येणार आहे. येथे अधिक बलाढ्य उमेदवार उतरवण्याचा अमित शहा यांचा प्लॅन आहे. त्यात मुंबईमधील ६, पुण्यातील ३ आणि विदर्भातील ५ जागांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/DA-uZBmp94F

मुंबईतील अल्पसंख्याक समाजाचा वरचष्मा असलेल्या ६ जागांवर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट या दोघांकडूनही दावा केला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून तिढा (MVA Seat Sharing Formula) निर्माण झाला आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखली जात आहे.

https://www.instagram.com/p/DA-tSsFiLPT

हरियाणामधील निकालानंतर महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराबाबत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फिडबॅक घेण्यात येत आहे. तसेच महायुतीमधून या ठिकाणी बंडखोरी होऊ नये यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

https://www.instagram.com/p/DA-nrmcJr71

तसेच मराठा समाज (Maratha Samaj) आणि ओबीसींमध्ये (OBJ Samaj) सामंजस्य निर्माण करण्यासाठी, तसेच बंडखोर उमेदवारांची समजूत घालण्यासाठी खास रणनीती आखण्यात येत आहे. महायुतीच्या जागावाटपामध्ये ओबीसी आणि मराठा समाजादरम्यान ताळमेळ बसवला जाईल. दोन्ही समाजातील लोकांना समान प्रमाणात तिकीटं दिली जातील. तिकीट वाटपाच्या फॉर्म्युल्याला जवळपास अंतिम रूप दिले गेले आहे.

https://www.instagram.com/p/DA-hDyKC-xq

तसेच स्वतः अमित शहा हे याबाबतच्या रणनीतीला अंतिम रूप देत आहेत. एवढंच नाही तर ओबीसींसाठीची नॉन क्रिमीलेअरचची मर्यादा वाढवण्याचा निर्णयही राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. तसा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे.

https://www.instagram.com/p/DA-duNOJ1ua

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed