Pune PMC News | आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आमदारांसह आजी-माजी नगरसेवकांची आणि ठेकेदारांची महापालिकेत धावपळ

PMC

पुणे: Pune PMC News | विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) आचारसंहिता लागण्यापूर्वी (Code Of Conduct) विविध निविदा मंजूर करण्यासोबतच मंजूर झालेल्या कामांच्या वर्क ऑर्डर काढण्यासाठी महापालिकेत धावपळ सुरू आहे. आचारसंहिता पुढील तीन-चार दिवसात लागू होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर विविध कामांसाठी निविदा काढण्यास अडचणी येतात.

https://www.instagram.com/p/DA-0iNBpj1E

या पार्श्वभूमीवर आपापल्या परिसरातील विविध विषय व कामे आचारसंहितेमध्ये अडकू नयेत, या कामांच्या वर्क ऑर्डर आणि निविदा आचारसंहितेपूर्वी मंजूर व्हाव्यात, यासाठी विद्यमान आमदारांसह आजी-माजी नगरसेवकांची आणि ठेकेदारांची चांगलीच धावपळ महापालिकेत पाहायला मिळत आहे. धावपळ करणाऱ्यांमध्ये सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांची अधिक संख्या आहे.

https://www.instagram.com/p/DA-uZBmp94F

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले (Rajendra Bhosale) यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.१०) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ४०० कोटी रुपयांच्या २२० निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

https://www.instagram.com/p/DA-tSsFiLPT

आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही कामांना मंजुरी देता येत नाही. त्यामुळे प्रशासनानेही आचारसंहितेच्या धास्तीने कामांचा वेग वाढवलेला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली.

https://www.instagram.com/p/DA-duNOJ1ua

या बैठकीमध्ये विविध कामांसाठी तब्बल ४०० कोटी रुपयांच्या २२० निविदा मंजूर करण्यात आल्या. स्थायी समितीच्या बैठकीत आपले विषय मंजूर करून घेण्यासाठी विभाग प्रमुखांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. जो तो फाइल घेऊन आयुक्तांच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/DA-TMdSpIXJ

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का

Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी

Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Election 2024 | वंचित कडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; विधानसभेसाठी प्रकाश आंबेडकरांची आघाडी

Maharashtra Assembly Election 2024 | महायुतीने विधानसभेची रणनीती बदलली; हरियाणा निकालाचा महाराष्ट्रात परिणाम होणार; काँग्रेस बॅकफूटवर?

Kothrud Pune Accident News | मिक्सरची धडक बसून रस्ता ओलांडणार्‍या तरुणीचा मृत्यु ! कोथरुडमधील बसस्टँडसमोरील घटना (Video)

You may have missed