Indapur Assembly Constituency | ‘नको आजी नको माजी, आता हवा नवीन बाजी’ ! हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीवरून शरद पवारांना इशारा; इंदापूरात बंडखोरी अटळ

इंदापूर: Indapur Assembly Constituency | माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत (Sharad Pawar NCP) प्रवेश केल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा नुकताच पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटातून इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक असलेले प्रवीण माने (Pravin Mane), आप्पासाहेब जगदाळे (Appasaheb Jagdale) आणि भरत शहा (Bharat Shah) यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
https://www.instagram.com/p/DA-2XCozU0t
हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्याने इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच या मेळाव्यातून इंदापुरमध्ये बंडखोरी करण्याचे थेट संकेतही दिले आहेत. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा नाहीतर मोठी बंडखोरी इंदापूरमध्ये होईल, असे म्हणथ दशरथ माने यांनी परिवर्तन मेळाव्यातून थेट इशारा दिला आहे.
https://www.instagram.com/p/DA-0iNBpj1E
प्रवीण माने म्हणाले, “इंदापूर तालुक्यात परिवर्तन करायचं आहे. गेली २४ वर्ष ताई आणि साहेबांच्यासोबत आपण राहिलो आहे. या 24 वर्षात पक्षाने कोणताही अन्याय केलेला नाही. आज आपण काय निर्णय घ्यावं यासाठी जनतेत आलो आहे. जनतेने हातात घेतलेली ही निवडणूक आहे. इंदापूर तालुक्यातील परिवर्तन साठी हा मेळावा आहे.
https://www.instagram.com/p/DA-zRNrCp4t
उजनी धरणातून आपल्याला आठ महिने पाणी मिळते, जेव्हा पीक काढायला येत तेव्हाच पाणी मिळत नाही. ही निवडणूक येणाऱ्या नव्या पिढीसाठी महत्वाची आहे. खडकवासला धरणाचा आवर्तन मिळालं पाहिजे यासाठी आपल्याला परिवर्तन पाहिजे”, असे म्हणत प्रविण माने यांनी इंदापुरमध्ये राजकारण तापणार असल्याचे संकेत दिले आहेत.
https://www.instagram.com/p/DA-yJPViDeB
दरम्यान या परिवर्तन मेळाव्यात बॅनरबाजी करण्यात आली. यामध्ये ‘नको आजी नको माजी, आता हवा नवीन बाजी’, आम्हाला इंदापुरचा कारभारी स्वच्छ चरित्र प्रामाणिक उच्च शिक्षित लोकांची कामे करणारा पाहिजे आणि तो फक्त एकच आहे. प्रवीण माने, आप्पासाहेब जगदाळे, असे मजकूर असलेले बॅनरही यावेळी पाहण्यास मिळाले.
https://www.instagram.com/p/DA-w9m-C-SZ
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण