Maharashtra Assembly Elections | भाजपचा जागावाटपाचा प्रस्ताव मुख्यमंत्री शिंदेंनी फेटाळला? तिन्ही पक्षाच्या नेत्यांशी अमित शहा चर्चा करणार; तिढा दिल्ली दरबारी सोडवला जाणार

मुंबई : Maharashtra Assembly Elections | आज केंद्रीय निवडणूक आयोगाची (Central Election Commission) पत्रकार परिषद पार पडणार आहे. दरम्यान निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) मध्ये जागावाटपावरून बैठका सुरु आहेत.
या विधानसभेला भाजप (BJP) १५० पेक्षा अधिक जागा लढविण्याच्या तयारीत आहे. याबाबत शिंदे गटाला (Shivsena) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar) तसा प्रस्तावही देण्यात आला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावला असल्याची माहिती आहे. (Mahayuti Seat Sharing )
त्यामुळे महायुतीमध्ये वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. यावेळी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात त्यांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत भाजपने मित्रपक्षांना १६०-८०-५० जागांचा प्रस्ताव दिला होता.
सुरुवातीला या प्रस्तावावर मित्रपक्षांनी सहमती दर्शवली. मात्र, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा प्रस्ताव धुडकावून लावल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गट आगामी निवडणुकीत ९० जागांसाठी आग्रही आहे. दुसरीकडे अजित पवार गटाला देखील अधिकच्या जागा हव्या आहेत. यामुळेच महायुतीत ४० जागांचा तिढा अद्याप सुटला नसल्याची माहिती आहे.
दरम्यान, जागावाटपाचा हा तिढा दिल्ली दरबारी सोडला जाणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीतील तीनही महत्वाच्या नेत्यांना दिल्लीत बोलावल्याची माहिती आहे.
येत्या आठवड्यात महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
त्यामुळे कुणाची मागणी पूर्ण होणार आणि कुणाचा हिरमोड होणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Maharashtra Assembly Elections)
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar NCP | अजित पवारांच्या दौऱ्याकडे माजी आमदाराची पाठ, घरवापसीची चर्चा;
अजित पवारांना आणखी एक धक्का
Maharashtra Assembly Election 2024 | मराठा आरक्षणाचा फटका रोखण्यासाठी भाजपचा
‘प्लॅन बी’ तयार; ‘हरियाणा पॅटर्न’ राबवत विधानसभा जिंकण्याची तयारी
Ajit Pawar NCP Vs Sharad Pawar NCP | अजित पवारांचा आमदार घड्याळ सोडत हाती तुतारी घेणार;
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण