Sameer Wankhede | आयआरएस अधिकारी समीर वानखेडे महायुतीकडून विधानसभा निवडणूक लढणार?, शिवसेना शिंदे गटाकडून हालचाली सुरु

Sameer Wankhede-Kranti Redkar

मुंबई: Sameer Wankhede | राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी तयारी सुरु केलेली आहे. निवडणुकीची घोषणा होताच उमेदवारांची जुळवाजुळव सुरु आहे.

मुंबईतील धारावी हा राखीव मतदारसंघ आहे (Dharavi Assembly Constituency). या मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विजय मिळवला होता. २०२४ मध्ये झालेल्या लोकसभेत त्या खासदार झाल्या. आता त्यांच्या जागी काँग्रेसकडून ज्योती गायकवाड (Jyoti Gaikwad) उतरणार असल्याची माहिती आहे.

महायुतीच्या जागावाटपात धारावीचा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला (Shivsena Shinde Group) मिळाला आहे. त्यानुसार आता शिंदे गटाकडून आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याबाबत शिवसेना शिंदे गटाकडून हालचाली सुरु आहेत.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed