Nanded Lok Sabha Bypoll Election | नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरला; काँग्रेसपुढे गड राखण्याचे आव्हान तर अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागणार

Baramati byelection 2026 | Sunetra Pawar's phone call also proved fruitless! Congress's 'claw' moved in Baramati; This condition was imposed to withdraw candidacy

मुंबई: Nanded Lok Sabha Bypoll Election | दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार निश्चित झाल्याची माहिती आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नांदेड व केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ तसेच राज्यातील विधानसभा विधानसभेच्या ४८ जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यानंतर राहुल गांधींनी वायनाडमधून राजीनामा दिला होता आणि रायबरेलीचे खासदार म्हणून शपथ घेतली होती. यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून प्रियांका गांधी निवडणूक लढवणार आहेत.

महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे वसंत चव्हाण खासदार होते. त्यांचे निधन झाले. यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पक्षाचा उमेदवार ठरला आहे. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण (Ravindra Vasant Chavan) यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Sharad Pawar On Jayant Patil | शरद पवारांचे जयंत पाटलांबाबत सूचक वक्तव्य; म्हणाले, ”
जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची…”

Maharashtra Assembly Election 2024 | काँग्रेसकडून पिंपरी, भोसरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघावर दावा;
अनेकांनी दिल्या मुलाखती

Pune ACB News | उत्पन्नापेक्षा कोट्यवधींचा मालमत्ता बाळगणार्‍या शिरीष यादव याच्यावर गुन्हा दाखल;
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Politics News | महायुतीच्या पुणे महानगर व पुणे ग्रामीण जिल्हा समन्वयक पदी संदीप खर्डेकर
यांची नियुक्ती; खर्डेकर म्हणाले – ‘महायुती पुणे शहर व जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व एकवीस जागा जिंकणार’

You may have missed